कोरोनाची दुसरी लाट येत्या 20 दिवसात असेल पीकवर, SBI च्या रिपोर्टमध्ये दावा

नवी दिल्ली : वृत्त संस्था – भारतीय स्टेट बँकेचे रिसर्च युनिट एसबीआय रिसर्चने आपल्या एका रिपोर्टमध्ये दावा केला आहे की, कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत वेगाने संसर्ग पसरत आहे, हे पहाता येत्या काही दिवसात आपण या लाटेच्या ‘पिक’ वर असू. जाणून घ्या पूर्ण बातमी.

काही दिवसात येईल पिक
एसबीआय रिसर्चने आपल्या नव्या रिपोर्टमध्ये दावा केला आहे की, मेच्या मध्यापर्यंत म्हणजे आतापासून पुढील 20 दिवसात भारत कोरोनाच्या दुसर्‍या लाटेच्या पिकवर असेल. तेव्हा देशात कोरोना संसर्गाचे सुमारे 36 लाख रूग्ण असतील. रिपोर्टमध्ये याचा अर्थव्यवस्थेवर होणारा परिणाम सुद्धा सांगण्यात आला आहे.

बदलून टाकला आर्थिक वृद्धीच्या दराचा अंदाज
राज्यांमध्ये लावण्यात येत असलेल्या आंशिक लॉकडाऊन किंवा विकेंड लॉकडाऊनमुळे देशात अर्थव्यवस्थेवर होणारा परिणाम पाहता एसबीआयने 2021-22 च्यासाठी देशाचा आर्थिक वृद्धी दर अंदाज सुद्धा बदलला आहे. वास्तविक जीडीपीच्या आधारावर हा वृद्धी दर 10.4% आणि नॉमिनल जीडीपीच्या आधारावर 14.2% राहू शकतो.

रिकव्हरी रेट येईल 77.8% वर
एसबीआय रिसर्चने आपल्या ’द पॉवर ऑफ व्हॅक्सीनेशन’ रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, अन्य देशांच्या अनुभवाच्या आधारावर ते या निष्कर्षावर पोहचले आहेत की, येत्या 20 दिवसात आपण कोरोनाच्या दुसर्‍या लाटेच्या पिकवर असू आणि आपला रिकव्हरी रेट 77.8% असेल.

रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, जर रिकव्हरी रेटमध्ये 1% ची सुद्धा घसरण झाली तर सक्रिय प्रकरणांच्या संख्येत 1.85 लाखांची वाढ होते. आताच्या आधारावर रिकव्हरीत 1% ची घसरण होण्यास अजून 4, 5 दिवस लागत आहेत, अशावेळी पुढील 20 दिवसात आपण कोरोनाच्या पिकवर असू. सध्या देशाचा रिकव्हरी रेट 82.5% आहे. मागील एक आठवड्यापासून देशात कोरोनाची रोज 3 लाख पेक्षा जास्त नवीन प्रकरणे येत आहेत.