‘कोरोना’ला हरवण्यासाठी भारत वापरणार नवा फॉर्म्युला, ‘हा’ आहे प्लॅन

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. देशातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या दीड लाखांच्या पुढे गेली आहे. कोरोना व्हायरसवर देशभरातील अनेक देश कोरोनावरील लस शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. तर दुसरीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी वेगेवेगळ्या औषधांचा वापर केला जात आहे. आता भारत कोरोनाला हरवण्यासाठी एक नवा फॉर्म्युला वापरत आहेत. नामांकित फार्मास्युटिकल कंपनी ग्लेनमार्क यांनी असा दावा केला आहे की भारतीय नियामक मंडळाचे महासंचालक जीसीजीआय यांनी नवीन उपचार आणि औषधांसाठी मान्यता दिली आहे.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव करण्यासाठी क्लिनिकल चाचणीसोबत पुढे जाण्यासाठी आता दोन अँटीव्हायरल औषधांचे मिश्रण भारतात वापरले जाणार आहे. यात फॅव्हीपिरवीर आणि युमिफेनोव्हिर यांचे मिश्रण समाविष्ट केले जाईल. ही क्लिनिकल चाचणी देशातील रुग्णालयात दाखल झालेल्या कोरोना रुग्णावर केली जाईल. तसेच या उपचारादरम्यान सुरक्षा आणि प्रभाविपणे याचे मूल्यांकन केलं जाईल. यापूर्वी चीन, हाँगकाँग आणि बांगलादेशात या औषधांचे मिश्रण कोरोनावर वारण्यात आले होते. आणि यामुळे कोरोना रुग्ण बरे झाले होते. यासाठी भारतातील कोरोनाचे रुग्ण दोन गटात विभागले जातील. ज्यामध्ये एका गटाला अँटी व्हायरल औषध तयार केलेल्या औषधाचे मिश्रण दिले जाईल, तर दुसऱ्या गटाला फक्त फॅव्हीपिरवीर दिलं जाईल.

ट्रायलबाबत कंपनीची माहिती
इंडिया टुडेनं दिलेल्या वृत्तानुसार, ग्लेनमार्क कंपनीत असे नमूद केलं आहे की, फॅव्हीपिरवीर आणि युमिफेनोव्हिर वेगवेगळे काम करतात, म्हणून दोन अँटीव्हायरल औषधांच मिश्रण केल्यास त्याचे परिणाम चांगले येतील असा प्राथमिक अंदाज आहे. या ट्रायलला FAITH (FA Vipiravir plus Um I Fenovir Trial) असे नाव देण्यात आले आहे.

कोणती आहेत ती 2 औषधं
फॅव्हीपिरवीर हे एक ओरल अँटी व्हायरल औषध आहे. 2014 मध्ये जपानमध्ये उद्भवलेल्या इन्फ्यूएन्झा व्हायरस संसर्गाच्या रुग्णांना हे औषध देण्यात आलं होतं. हे अँटी व्हायरल औषध प्रतिकृती प्रतिबंधित करते. तर युमिफेनोव्हिर हे आणखी एक ओरल अँटीव्हायरल औषध आहे जी पेशींना व्हायरसच्या संपर्कात येण्यास प्रतिबंधित करते आणि व्हायरल एंट्री इनहिबिटर म्हणून काम करते.