Coronavirus : ‘कोरोना’ची त्सुनामी ! ‘या’ महिन्यात असा होईल ‘प्रकोप’, बेड-व्हेंटीलेटर्स देखील मिळणं होईल ‘अवघड’

लखनऊ : ज्या लोकांना कोरोना-व्हायरसची सध्याची स्थिती खुपच बिकट वाटत आहे, असे ज्यांना वाटते त्यांनी प्रार्थना करावी की, नोव्हेंबर महिना येऊ नये. कारण, एका संशोधनात दावा करण्यात आले आहे की, नोव्हेंबर येता-येता कोविड 19 महामारी सर्वोच्च टोक गाठणार आहे. स्थिती हाताबाहेर जाईल आणि रूग्णांची संख्या अशी वाढेल की, भारतात आयसीयू बेड आणि व्हेंटीलेटरचा तुटवडा जाणवू शकतो.

भारतीय आयुर्विज्ञान संशोधन परिषद (आयसीएमआर) अंतर्गत गठीत ऑपरेशन्स रिसर्च ग्रुपच्या संशोधकांनी एक अभ्यास केला, ज्यामध्ये दावा करण्यात आला आहे की, लॉकडाऊनमुळे महामारी सर्वोच्च टोकावर पोहचण्याची स्थिती 34 ते 76 दिवस पुढे सरकली आहे. हे सुद्धा सांगण्यात आले की, लॉकडाऊनमुळे संसर्गाची प्रकरणे 69 ते 97 % पर्यंत कमी झाली आहेत. अशात जर लॉकडाऊन झाले नसते तर स्थिती खुप अगोदरच यापेक्षा जास्त प्रकरणांसह वाईट झाली असती.

नोव्हेंबरमध्ये कोरोनामुळे होणार प्रकोप
सांगण्यात आले की, नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात कोरोना व्हायरस आपल्या सर्वोच्च टोकावर पोहचू शकतो. संसर्गाची प्रकरणे इतकी वाढतील की, भारताकडे आयसोलेशन बेड, आयसीयू बेड आणि व्हेंटीलेटरची कमतरता भासेल. अशी स्थिती किमान दोन ते तीन महिने राहील, असा अंदाज आहे.

सरकारची ठोस उपाययोजना महामारी कमी करू शकते
परंतु, या अभ्यासात असेही म्हटले आहे की, जर सरकारने ठोस पावले उचलली तर महामारीचा प्रभाव कमी करता येईल. याअंतर्गत जर जनआरोग्य उपाययोजना वाढवल्या तर महामारीचा परिणाम कमी होईल. लॉकडाऊनवर सरकारने पुन्हा विचार करणे आणि या दरम्यान टेस्ट, उपचार आणि रूग्णांना वेगळे ठेवण्याची तयारी केल्यास 70 टक्केपर्यंत कोरोना प्रकरणांना आळा घालता येईल.

भारतातील कोरोनाची सध्याची स्थिती
अनलॉक लागू झाल्यानंतर रोज कोरोनाची 10 हजारपेक्षा जास्त प्रकरणे समोर येत आहेत. तसेच मृतांचा आकडासुद्धा खुपच वाढला आहे. सध्याच्या आकड्यांनुसार देशात कोरोनाची एकुण 320,922 प्रकरणे आहेत. तर 149,348 अ‍ॅक्टिव्ह केस आहेत. दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत एकुण 162379 रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर मृतांची संख्या 9195 झाली आहे.