नोकरीची सुवर्णसंधी ! ‘या’ ७ क्षेत्रांत होणार मेगाभरती

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – चालू आर्थिक वर्षात ऑक्टोबर ते मार्च या तिमाहीत देशातील नोकरीच्या संधींमध्ये वाढ होणार आहे. याबाबत नुकत्याच आलेल्या अहवालानुसार २०१९ च्या पहिल्या सहा महिन्यांच्या आधारावर अर्थव्यवस्थेत सरकारी सुधारणांमुळे १९ ते ७ क्षेत्रात गती वाढवण्याची चिन्हे दिसत आहेत. तसेच, या अहवालात असेही म्हटले की, ९ क्षेत्रातील नोकऱ्यांच्या संधीही कमी असतील.

या क्षेत्रांमध्ये चांगले संकेत
चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत नोकरीच्या संधीत सुमारे ७. १२ टक्क्यांनी वाढ होणार आहे. आरोग्य सेवा, फार्मास्युटिकल्स, माहिती तंत्रज्ञान, ई-कॉमर्स, टेक स्टार्टअप्स, शैक्षणिक सेवा, केपीओ, ऊर्जा, आणि लॉजिस्टिक्स क्षेत्रात सकारात्मक चिन्हे दिसून येत आहेत.

परंतु त्यासोबतच मॅन्युफॅक्चरिंग, अभियांत्रिकी आणि पायाभूत सुविधा, बांधकाम आणि भू संपत्ती, वित्तीय सेवा, ट्रॅव्हल, हॉस्पिटॅलिटी, एफएमसीजी, कृषी आणि एग्रोकेमिकल्स या क्षेत्रांमध्ये रोजगाराच्या संधी कमी असणार आहेत.

८ ते ९ क्षेत्रामध्ये दुप्पट अंकाने वाढ
टीमलीझ सर्व्हिसचे सह-संस्थापक आणि कार्यकारी उपाध्यक्ष ऋतुपर्णा चक्रवर्ती यांनी सांगितले कि, “जीडीपी विकास दरात घट झाल्यामुळे काही क्षेत्रातील नोकरीच्या आऊटलूकवर परिणाम झाला आहे.” तसेच ८ पैकी ९ क्षेत्रांमध्ये दुप्पट वाढ दिसून येईल. लॉजिस्टिक्स व शैक्षणिक सेवांमध्ये केवळ १४.३६ टक्के अधिक रोजगार वाढविण्यात येणार आहे.

या शहरांतील नोकऱ्यांमध्ये वाढ
मुंबई, हैदराबाद, पुणे, चेन्नई, बेंगळुरू, दिल्ली, गुरुग्राम आणि कोलकाता येथे नोकरीच्या अधिक संधी उपलब्ध होणार आहेत. मात्र दुसरीकडे इंदोर, कोईंबटूर, अहमदाबाद, कोची आणि नागपुरातही रोजगार कमी होणार आहेत .

Visit : Policenama.com