home page top 1

‘या’ कारणामुळं बालाकोटवर रात्रीच्या वेळी हल्‍ला, बीएस धनोआ यांचा ‘गौप्यस्फोट’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – वायु सेना प्रमुख एयर चीफ मार्शल बीएस धनोआ यांनी बालकोटच्या एअर स्ट्राईक बाबत एक मोठा खुलासा केला आहे. बालाकोटमध्ये कारवाई करताना रात्रीच्या वेळेसच हवाई हल्ला का करण्यात आला याबाबतचा खुलासा मार्शल बीएस धनोआ यांनी केला आहे. ते म्हणाले की चांगले टेक्निक असलेल्या देशांनी रात्रीचाच हल्ला केलेला आहे. यावर त्यांनी गल्फ वॉरचे उदाहरण देत सांगितले की, गल्फ वॉरची सुरुवात देखील रात्रीचीच झाली होती आणि तसेही जे रात्री हल्ला करतात त्यांच्याकडे उत्तम टेक्निक आहे असच समजलं जात.

भारत रात्रीच्या वेळेस हल्ला करून पळून गेला असा प्रश्न विचारल्यावर धनोआ यांनी हे ऊत्तर दिले होते. पुलावामामध्ये झालेल्या हल्ल्यात कारवाई करताना भारताने बालाकोटमधी जैश – ए – मोहम्मदच्या ठिकाण्यावर बॉब हल्ला केला होता. पाकिस्तानवर केलेल्या या हल्ल्यामुळे आम्ही यशस्वी झालो ही खूप मोठी गोष्ट आहे असे धनोआ यांनी यावेळी म्हणाले.

आम्ही त्या वेळेस कोणती हत्यारे वापरली ? किंवा या बाबतची अधिक माहिती आता या ठिकाणी नाही देऊ शकत असे बीएस धनोआ म्हणाले. पाकिस्तानच्या मंत्र्यांच्या परमाणू युद्धाच्या धमकीला उत्तर देताना धनोआ यांनी सांगितले की, शेवटी निर्णय सरकारला घ्यायचा आहे, आम्ही कोणत्याही प्रकारच्या युद्धाला तयार आहोत आणि आम्हाला आमची क्षमता माहिती आहे.

काय झाले होते नेमके तेव्हा ?
14 फेब्रुवारी रोजी पुलवामामध्ये सीआरपीएफच्या जवानांवर झालेल्या आतंकवादी हल्ल्यात  40 जवान शहीद झाले होते. त्यानंतर तेरा दिवसांनी भारताच्या वायू सेनेने पाकिस्तानात घुसून बालाकोटमधील दहशतवादी संघटनांचे तळ उध्वस्थ केले होते.

Loading...
You might also like