देशाचा मूड : दक्षिण भारतात PM मोदींची लोकप्रियता कमी, 38% मुस्लिमांनी दिले पॉझिटिव्ह रेटिंग

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – चीनशी सीमा वाद असो की, कोरोना संकट. पीएम नरेंद्र मोदी आपल्या नेतृत्वाच्या बळावर एक राजकीय नेते म्हणून मजबूत होऊन पुन्हा उभे राहीले आहेत. परंतु, काही ठिकाणी अजूनही पीएम मोदी यांना तशी लोकप्रियता मिळालेली नाही, जशी लोकप्रियता अन्य ठिकाणी मिळाली होती. मग तो दक्षिण भारत असो की, मुस्लिम वर्ग. अशा स्थितीत मूड ऑफ द नॅशन (MOTN) काय होता, हे जाणून घेण्यासाठी आजतकसाठी कार्वी इनसाइट्स लिमिटेडने सर्वे केला.

सर्वेच्या परिणामानुसार, पीएम मोदी आणि भाजपाचा दक्षिण भारतात तेवढा प्रभाव दिसत नाही, जेवढा देशाच्या इतर भागात दिसत आहे. दक्षिण भारतात पीएम मोदी यांची लोकप्रियता सर्वात कमी आहे. येथे केवळ 63 टक्के लोकांनी त्यांना पसंती दर्शवली आहे.

पीएम मोदी आणि एनडीएसाठी हा अतिशय चिंतेचा विषय असायला हवा की देशातील मुस्लिम समाज अजूनही त्यांच्या कामगिरीवर नाखुश आहे. इतर समाजाच्या तुलनेत मुस्लिम समाजाकडून सरकारला खुप कमी रेटिंग मिळाले आहे. केवळ 38% मुस्लिमांनी त्यांना पॉझिटिव्ह रेटिंग दिल्याचा दावा आजतकच्या या सर्वेत करण्यात आला आहे.

पीएम मोदी यांना पुन्हा सत्तेत येण्यासाठी भाजपाचा हिंदुत्वाचा अजेंडा उपयोगी आला, ज्यास आरएसएसने सुद्धा खुप सपोर्ट केला. सर्वेनुसार, लोक मोदी सरकारच्या कार्यकाळातील दोन सर्वात मोठी कामे, सुप्रीम कोर्टाने अयोध्येत राम मंदिर उभारण्याचा दिलेला निर्णय आणि काश्मीरमध्ये कलम -370 रद्द करण्याचा निर्णय मानत आहेत. हे दोन्ही मुद्दे भाजपा आणि संघ परिवाराच्या लिस्टमध्ये खुप कालावधीपर्यंत सहभागी होते.

सध्या, सर्वेच्या हिशेबाने पीएम मोदी यांना राजकीय स्तरावर कोणताही धोका नाही. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, पीएम मोदी यांची लोकप्रियता आता मुद्द्यावर ठरत नाही. कलम-370 करणे असो की पाकिस्तानच्या बालाकोटमध्ये हवाई हल्ल्याचा आदेश देणे असो, यामध्ये सर्वामध्ये त्यांची प्रतिमा मजबूत नेता म्हणून बनली आहे. सर्वेमध्ये 38% लोकांनी म्हटले की, नरेंद्र मोदी यांनी भारताचे पंतप्रधान म्हणून परत आले पाहिजे.