काय सांगता ! होय, ना दिल्ली, ना मुंबई ‘या’ शहरातील तरूणाई सर्वात कमी वयात गमावतेय ‘कौमार्य’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – एक वेळ अशी होती की, भारतीय लोक सेक्सवर कधीच खुलून भाष्य करत नसत. परंतु आता वेळी बदलली आहे. कोणताही संकोच न बाळगता आता भारतीय लोक देखील आपलं मत खुलेपणानं मांडू लागले आहेत. एका सेक्स सर्व्हेमधून ही बाब समोर आली आहे. याशिवाय देशातील अनेक शहरे सेक्सबाबत पुढे जाताना दिसत आहेत. पहिल्यांदा सेक्सचा अनुभव घेणाऱ्यांचं सरासरी वय कमी होताना दिसत आहे.

सर्वात लवकर व्हर्जिनिटी गमावणाऱ्या लोकांमध्ये गुवाहाटी शहर सर्वात पुढे आहे. या शहरातील 61 टक्के लोकांचं म्हणणं आहे की, त्यांनी पहिल्यांदा सेक्सचा अनुभव किशोरवयातच घेतला आहे. या बाबतीत सर्व्हे करण्यात आलेल्या इतर शहरांपेक्षा हे शहर सर्वात पुढे राहिलं आहे. देशभरातील 33 टक्के लोकांचा दावा आहे की, त्यांनी पहिल्यांदा सेक्सचा अनुभव किशोर वयातच घेतला होता.

2003 मध्ये झालेल्या याच सेक्स सर्व्हेमध्ये फक्त 8 टक्के लोकांनी हे मान्य केलं होतं की, वयाच्या 18 वर्षांच्या आधीच त्यांनी सेक्सचा अनुभव घेतला. असे समोर आले आहे की, लोक सेक्सला घेऊन अधिक खुलले आहेत.

2019 मधील सर्व्हेनुसार, भारतात 53 टक्के लोक आपल्या पार्टनरच्या व्हर्जिनिटीला खूपच गांभीर्याने घेतात. हा सर्व्हे 23 जानेवारी 2019 ते 20 फेब्रुवारी 2019 दरम्यान 4028 लोकांच्या संभाषणावर आधारीत आहे. यात 14-29, 30-49, 50-69 अशा तीन वयोगटातील लोकांचा समावेश होता.

Visit : Policenama.com