लशीचे डोस बुक करण्याच्या बाबतीत भारत ‘अव्वल’, Novavax ला सर्वाधिक पसंती

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना व्हायरसविरुद्धच्या युद्धामध्ये भारत जोरदार उपस्थिती नोंदवित आहे. ड्यूक युनिव्हर्सिटीच्या आकडेवारीनुसार कोरोना वॅक्सिन डोस बुकिंगच्या बाबतीत भारत अव्वल क्रमांकावर आहे. भारताने 160 दशलक्ष लस डोस देण्याची ऑर्डर दिली आहे. त्याचबरोबर, लशी बुकिंगच्या बाबतीत भारतानंतर युरोपीयन युनियन दुसर्‍या क्रमांकावर आहे आणि तिसर्‍या क्रमांकावर अमेरिकेचे नाव आहे. दरम्यान, लशीची उपलब्धता चाचण्यांच्या परिणामावर अवलंबून असते.

तज्ज्ञ म्हणतात की, एखाद्या व्यक्तीला कोरोना विषाणूचा सामना करण्यासाठी लशीच्या दोन डोसची आवश्यकता असेल. या दृष्टिकोनातून, भारतातील 80 कोटी नागरिकांसाठी लशीच्या डोसचे कन्फर्म बुकिंग केले गेले आहे. गेल्या नोव्हेंबरमध्ये आरोग्यमंत्री हर्षवर्धन म्हणाले होते, की भारत लस उत्पादकांशी 50 कोटी लस डोससाठी चर्चेत आहे. विशेष गोष्ट अशी आहे की, भारताने ऑक्सफोर्ड-अ‍ॅस्ट्रॅजेनेका लस उमेदवाराची म्हणजेच कोविशील्डचे 50 कोटी डोस बुक केले आहेत. त्याचबरोबर ड्यूक विद्यापीठाच्या सद्य आकडेवारीवरून असे दिसून येते, की नोव्हाव्हॅक्सवर भारताने सर्वाधिक विश्वास दर्शविला आहे. या लशीचे 100 कोटी डोस बुक केले आहेत. भारताने तीन आंतरराष्ट्रीय लस उमेदवारांचे डोस बुक केले आहेत.

कॅनडा आणि ब्रिटन आघाडीवर
कॅनडा आणि ब्रिटनने त्यांच्या नागरिकांसाठी 7 कंपन्यांशी चर्चा केली आहे. लस डोस बुकिंगच्या बाबतीत ही संख्या कोणत्याही देशापेक्षा जास्त आहे. त्याच वेळी, अमेरिका आणि युरोपीयन संघाने 6-6 लस कंपन्यांशी करार केला आहे. चीन आणि रशियाने स्वत:ला या शर्यतीपासून दूर ठेवले आहे. दोन्ही देश आपापले लस अभियान राबवित आहेत. रशियाच्या स्पुटनिक व्हीमध्येही भारताने प्रचंड रस दाखविला. भारताने स्पुटनिक 5 चे 100 दशलक्ष डोस बुक केले आहेत.

ऑक्सफोर्ड – अ‍ॅस्ट्रॅजेनेका आणि नोव्हाव्हॅक्सवर सर्वांचा विश्वास
खास गोष्ट म्हणजे या लशीच्या शर्यतीत अनेक मोठ्या देशांनी ऑक्सफोर्ड-एस्ट्राझेनेका लस आणि नोव्हाव्हॅक्सवर खूप मोठे दावे खेळले आहेत. कोविशील्डला सर्वाधिक 150 कोटी डोसचे बुकिंग मिळाले आहे. दरम्यान, अमेरिकन लस नोव्हाव्हॅक्सच्या 120 कोटी डोस बुक केले आहेत. सनोफी, फायझर-बायोन्टेक आणि मॉडर्ना या लशीसाठी भारताने डोस बुक केलेला नाही.

You might also like