नवख्या रिषभ पंतनं कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा ‘तो’ रेकॉर्ड मोडला

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारताने विंडीजविरुद्ध तीन टी-२० सामन्यांची मालिका ३-० अशी जिंकत विंडीजला धूळ चारली. या सामन्यात विंडीजने दिलेले १४६ धावांचे आव्हान भारतीय संघाने आरामात पूर्ण करत विंडीजवर विजय मिळवला. या सामन्यात भारतीय संघाचा यष्टीरक्षक रिषभ पंत याने महत्वाची आणि मोलाची भूमिका पार पाडली.

या सामन्यात रिषभ पंत याने कर्णधार विराट कोहलीबरोबर शानदार भागीदारी करत संघाला विजय मिळावून दिला. या सामन्यात रिषभ पंत याने ४६ चेंडूत ४ चौकार आणि चार षटकारांसह शानदार ६५ धावा केल्या. पहिल्या दोन सामन्यात त्याला विशेष कामगिरी करता आली नव्हती. त्यामुळे त्याने या सामन्यात सगळी उणीव भरून काढत धडाकेबाज खेळी केली. या शानदार खेळीसह त्याने आपले पहिले आंतरराष्ट्रीय टी-२० अर्धशतक देखील साजरे केले. त्याचबरोबर त्याने या धावा करत भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी याचा रेकॉर्ड देखील मोडला. रिषभने या सामन्यात ६५ धावा केल्या, तर धोनीने याआधी २०१७ मध्ये इंग्लंडविरुद्ध ५६ धावा केल्या होत्या. त्यामुळे धोनीचा टी-२० सामन्यातील सर्वाधिक धावांचा विक्रम रिषभ पंत याने मोडला.

दरम्यान, टी-२० मालिकेत विजय मिळवल्यानंतर आता भारतीय संघ एकदिवसीय सामन्यांसाठी सज्ज असून आजपासून एकदिवसीय मालिकेला सुरुवात होत असून पहिला सामना आज खेळवला जाणार आहे.

आरोग्यविषयक वृत्त