‘मोदी सरकार’साठी खुशखबर ! जगातील 5 वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला ‘भारत’, ‘इंग्लंड-फ्रान्स’ला टाकलं मागं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अनेक नकारात्मक बातम्यांमध्ये मोदी सरकारसाठी एक चांगली बातमी आहे. भारत जगातील 5 वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेला देश बनला आहे. 2.94 ट्रिलियन डॉलरच्या इकॉनॉमीसह भारताने 2019 मध्ये ब्रिटन आणि फ्रान्सला मागे टाकले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढील पाच वर्षात भारताला 5 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनवण्याचे लक्ष्य ठेवले आहे.

अमेरिकेची संशोधन संस्था वर्ल्ड पॉप्युलेशन रिव्ह्यूने आपल्या अहवालात म्हटले आहे की, स्वयंपूर्ण बनण्याच्या नितीमुळे भारत पुढे जाऊन एक खुल्या अर्थव्यवस्थेचा देश म्हणून विकसित होत आहे. हा अहवाल प्रसिद्ध करणारी वर्ल्ड पॉप्युलेशन रिव्ह्यू ही संस्था अमेरिकेतील एक स्वतंत्र संस्था आहे.

काय म्हटले आहे अहवालात

या अहवालात म्हटले आहे की, सकल राष्ट्रीय उत्पादन (जीडीपी) च्या बाबतीत भारत 2.94 लाख करोड (ट्रिलियन) डॉलरसह जागातील पाचवा मोठी अर्थव्यवस्थेचा देश बनला आहे. याबाबतीत भारतातने 2019 मध्ये ब्रिटन आणि फ्रान्सला मागे टाकले आहे.

ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेचा आकार 2.83 ट्रिलियन डॉलर आहे, तर फ्रान्सचा 2.7 ट्रिलियन डॉलर आहे. क्रयशक्ति समानता (पीपीपी) च्या आधारावर भारताचा जीडीपी 10.51 ट्रिलियन डॉलर आहे आणि तो जपान तसेच जर्मनीच्या पुढे आहे. परंतु, भारतातील अधिक लोकसंख्येमुळे प्रति व्यक्ती जीडीपी अवघा 2170 डॉलर आहे. अमेरिकेत प्रति व्यक्ती जीडीपी 62,794 डॉलर आहे. अहवालात म्हटले आहे की, भारताचा जीडीपी लागोपाठ तिसर्‍या तिमाहीत कमजोर राहू शकतो. तो 5 टक्क्यांच्या जवळपास राहू शकतो.

काँग्रेसच्या कार्यकाळाचे कौतूक

या अहवालात काँग्रेसच्या कार्यकाळात सुरू करण्यात आलेल्या उदारीकरणाचे कौतूक केले आहे. यात म्हटले आहे की, भारतात आर्थिक उदारीकरणाची सुरूवात 1990 च्या दशकात झाली. उद्योगांना नियंत्रणमुक्त करण्यात आले आणि परदेशी व्यापार आणि गुंतवणुकीवरील नियंत्रण कमी करण्यात आले. सोबतच सरकारी कंपन्यांचे खासगीकरण करण्यात आले. या उपायांमुळे भारताला अर्थव्यवस्था वाढविण्यास मदत झाली.

जीडीपी वाढ मंदावली

जीडीपी वाढीच्या बाबतीत भारतीय अर्थव्यवस्थेची स्थिती चांगली नाही. अनेक रेटिंग संस्थांनी भारताची जीडीपी ग्रोथ कमी दर्शवली आहे. रेटिंग एजेन्सी मूडीज इन्व्हेस्टर्स सर्व्हिसने 2020 साठी जीडीपी कमी केला आहे. मूडीजने त्यांचा अंदाज 6.6 टक्क्यांवरून कमी करून 5.4 टक्के केला आहे. यासोबतच मूडीजने 2021 मध्ये जीडीपी वाढीचा अंदाज 6.7 टक्के कमी करून 5.8 टक्के केला आहे.

मूडीजने म्हटले आहे की, कोरोना व्हायरसच्या प्रकोपामुळे जागतिक अर्थव्यवस्थेत मरगळ आली आहे, त्यामुळे भारताचा जीडीपी वाढीचा वेग कमी होऊ शकतो. भारतात सध्या कोणत्याही सुधारणांच्या शक्यता कमी असल्याचे मानले जात आहे.

भारत सरकारचे केंद्रीय सांख्यिकी कार्यालय आणि वर्ल्ड बँकेने आर्थिक वर्ष 2019-20 मध्ये केवळ 5 टक्के जीडीपी ग्रोथ ठेवण्याचा अंदाज जाहिर केला आहे. तर सरकारच्या आर्थिक सर्व्हेत आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये जीडीपी ग्रोथ रेट 6-6.5 टक्क्यांच्या दरम्यान राहील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

You might also like