भारत – US च्या क्षेपणास्त्र करारावरून घाबरला PAK, म्हणाला – ‘प्रदेशात अस्थिरता निर्माण होईल’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारत आणि अमेरिका यांच्यात झालेल्या संरक्षण कराराबाबत पाकिस्तानने मोठे विधान केले आहे. पाकिस्तानचे म्हणणे आहे की, ही चिंताग्रस्त बाब आहे आणि यामुळे अस्थिरता निर्माण होऊ शकते.

खरतर, अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने भारताला हार्पून क्षेपणास्त्र आणि मार्क ५४ टोरपीडोची विक्री करण्याबाबत आपल्या देशातील काँग्रेसला अधिकृतपणे माहिती दिली आहे. यानंतर पाकिस्तानचे हे विधान आले आहे.

पाकिस्तानच्या परराष्ट्र कार्यालयाच्या प्रवक्त्या आयशा फारुकी म्हणाल्या की, अशा प्रकारच्या क्षेपणास्त्र यंत्रणेची विक्री व तांत्रिक सहाय्यता अशा वेळी होत आहे, जेव्हा महामारीशी लढण्यासाठी जागतिक प्रयत्न केले जात आहेत. यामुळे दक्षिण आशियातील आधीची संवेदनशील परिस्थिती आणखी अस्थिर होईल.

इस्लामाबादमध्ये झालेल्या मीडिया ब्रीफिंगमध्ये आयशा फारूकी म्हणाल्या की, पाकिस्तानने भारताला अत्याधुनिक शस्त्रास्त्रांच्या विक्रीबाबत आपली चिंता स्पष्ट केली आहे. पाकिस्तान आणि भारत यांच्यात उच्चायुक्त पातळीपर्यंतच्या मुत्सद्दी संबंधांच्या जीर्णोद्धारासंदर्भात फारुकी यांनी उत्तर दिले कि पाकिस्तानला आपल्या सर्व शेजार्‍यांशी नेहमीच चांगल्या संबंधांची अपेक्षा आहे.

काश्मीरबाबत बोलताना फारुकी म्हणाल्या कि चर्चेसाठी भारताला अनुकूल वातावरण तयार करण्याची आवश्यकता आहे, जे काश्मिरी जनता आणि संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद (यूएनएससी) च्या ठरावानुसार काश्मीर वाद सोडवू शकतात.

याशिवाय पाकिस्तानमध्ये कोरोना व्हायरसच्या परिस्थिती संदर्भात त्यांनी सांगितले की, COVID-19 महामारी द्वारे उद्भवलेल्या अभूतपूर्व आव्हानाला उत्तर देताना पाकिस्तान सरकार कोणताही भेदभाव न करता सगळ्या नागरिकांना संरक्षण देत आहे.