Covid-19 Vaccine Update : ‘कोरोना’ वॅक्सीनसाठी आपली ताकद अजमावतोय भारत, दिली 600 मिलियन डोसची प्री ऑर्डर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतात कोरोना व्हायरसची प्रकरणे 82 लाखांच्या पुढे गेली आहेत. आतापर्यंत देशात 1 लाख 20 हजारपेक्षा जास्त लोकांचा जीव या व्हायरसच्या संसर्गामुळे गेला आहे. देशातील तीन कंपन्या कोरोनाची वॅक्सीन डेव्हलप करण्यात गुंतल्या आहेत. यादरम्यान भारताने कोरोना व्हायरस वॅक्सीनच्या 600 मिलियन डोसच्या प्री-ऑर्डरसाठी आपल्या उत्पादन क्षमतेचा वापर केला आहे. भारत आता यानंतर एक अरब डोससाठी चर्चासुद्धा करत आहे. एका स्टडीनुसार, एवढी वॅक्सीन कमीतकमी निम्म्या लोकसंख्येचे लसीकरण करण्यासाठी पुरेशी आहे. बहुतांश लशीकरणात दोन डोसची गरज भासते.

’हिंदुस्तान टाइम्स’च्या एका वृत्तानुसार, ग्लोबल अनालिसिस कंपनी अ‍ॅडव्हान्स मार्केट कमिटमेंट्सने आपल्या स्टडीमध्ये याची माहिती दिली आहे. अमेरिकेनंतर भारत दूसरा असा देश आहे, ज्याने वॅक्सीनची आतापर्यंत इतकी जास्त प्री ऑर्डर दिली आहे. अमेरिकेने कोरोना वॅक्सीनसाठी अगोदर 810 मिलियन डोसची ऑर्डर दिली होती आणि आता 1.6 बिलियनसाठी चर्चा सुरू आहे. अमेरिका आणि भारत दोन असे देश आहेत, जे कोरोनाने सर्वात जास्त प्रभावित आहेत.

अमेरिकेतील ड्यूक ग्लोबल हेल्थ इनोव्हेशन सेंटरने कोविड-19 वॅक्सीनसाठी खरेदी कराराचे विश्लेषण दाखवले आहे. याच्यानुसार, जगातील सर्व लोकसंख्येला कोरोना वॅक्सीनने कव्हर करण्यासाठी तीन ते चार वर्ष लागतील. मात्र, उच्च उत्पन्न असणारे देश आणि भारतासारख्या उत्पादन क्षमता असणार्‍या काही मध्यम उत्पन्नवाल्या देशांनी अगोदरच जवळपास 3.8 बिलियन डोस खरेदी केले आहेत.

ड्यूक ग्लोबल हेल्थ इनोव्हेशन सेंटरचे असिस्टंट डायरेक्टर (प्रोग्राम) अँड्रिया डी टेलर यांनी म्हटले आहे की, यूएसएने सर्वात मोठ्या संख्येत (810 मिलियन) डोसची प्री-ऑर्डर दिली आहे. यानंतर भारताने 600 मिलियन डोसची प्री ऑर्डर निश्चित केली आहे आणि 1 अरब डोससाठी चर्चा सुरू आहे. युरोपीय संघाने 400 मिलियन डोस निश्चित केले आहेत. सोबतच 1.565 अरब डोससाठी चर्चा सुरू आहे. कॅनडाने आपल्या लोकसंख्येच्या 527% भागाला कव्हर करण्यासाठी आवश्यक वॅक्सीन खरेदी केली आहे, यानंतर ब्रिटनचा नंबर येतो.

तिकडे, रशियाचे आरोग्य मंत्री मिखाइल मुराश्को यांनी दावा केला आहे की, 20 देशांनी वॅक्सीन स्पूतनिक-व्ही साठी प्री-ऑर्डर केली आहे. त्यांनी सांगितले की, जगातील 20 देशांनी वॅक्सीनच्या कोट्यवधी डोसमध्ये स्वारस्य दाखवले आहे. यामध्ये भारत आणि अमेरिका सुद्धा सहभागी आहे. रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंड (आरडीआयएफ) वॅक्सीन मोठ्या मात्रेत बनवणे आणि परदेशात प्रमोट करण्यासाठी गुंतवणूक करत आहे.