India vs Australia 2nd Test : विराट कोहली मायदेशात परतण्यापूर्वी भरवणार टीममधील खेळाडूंची विशेष ‘शाळा’ !

पोलिसनामा ऑनलाईन – ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेलेल्या टीम इंडियाला कसोटी मालिकेत सुरुवातीलाच धक्का बसला. पहिल्याच कसोटीत ऑस्ट्रेलियानं 8 विकेट राखून दणदणीत वियज मिळवला आणि मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. यानंतर अवघ्या 36 धावात भारताचा दुसरा डाव गडगडला. अशी लाजिरवाणी कामगिरी झाल्यानं टीम इंडियातील खेळाडूंचं मनोबल खचलं आहे. या कसोटीनंतर टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली (Virat Kohli) पत्नी आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) हिच्या बाळंतपणासाठी मायदेशी परत येणार आहे. परंत त्याआधी टीममधीळ खेळाडूंसाठी शाळा भरवणार आहे.

खेळाडूंचं मनोबल वाढावं म्हणून विराट कोहली विशेष मीटींग घेणार आहे. ही मीटींग आज होणार आहे. मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे. या सत्रात विराट खेळाडूंना त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून देणार आहे. खास बात अशी की, खेळाडूंसोबतच्या मीटींगनंतर विराट प्रत्येक खेळाडू सोबत काही काळ घालवणार आहे. यात तो प्रत्येकाचं मनोबल उंचावण्याचा प्रयत्न करणार आहे.

विराटच्या अनुपस्थितीत पुढील 3 कसोटींमध्ये अजिंक्य रहाणे संघाचं नेतृत्व सांभाळणार आहे. त्यामुळं रहाणेही या सत्रात खेळाडूंसबत चर्चा करणार आहे. विशेष म्हणजे मायदेशात परतल्यानंतर विराट सतत संघाच्या संपर्कात असणार आहे.

संघ व्यवस्थापनेतील सूत्रांनी सांगितलं की, आम्ही एक सामना गमावला आहे. परंतु अजूनही 3 सामने शिल्लक आहेत. त्यामुळं विराट प्रत्येक खेळाडूंशी एकत्रितरित्या आणि वैयक्तिकरित्या संवाद साधणार आहे. यामुळं खेळाडूंमध्ये पुन्हा उत्साह निर्माण होईल.

दुसऱ्या कसोटीतली प्लेइंग 11 मध्ये शुबमन गिल, मयांक अग्रवाल, चेतश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, लोकश राहुल, वृद्धीमान सहा/रिषभ पंत, रवींद्र जडेजा, आर अश्विन, जसप्रीत बुमराह, उमेश यादव, मोहम्मद सिराज हे खेळाडू असणार आहेत.