India Vs Australia : भारताला मोठा धक्का ! दुखापतीमुळे महत्त्वाचा खेळाडू पहिल्या कसोटीला मुकणार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  वन डे मालिकेत पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर भारतीय संघाने ट्वेंटी-20 मालिकेत जबरदस्त कमबॅक केले. भारताने 2-0 अशी आघाडी घेतली आहे. भारतीय संघाची गाडी रुळावर येत असल्याचे वाटत असतानाच भारतीय संघाला एक मोठा धक्का बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ट्वेंटी-20 मालिकेनंतर या दोन संघांमध्ये कसोटी मालिका होणार आहे. ही कसोटी मालिका 17 डिसेंबरपासून सुरू होणार असून, या मालिकेत टीम इंडियाला आधीच दुखापतग्रस्त खेळाडूंनी त्रस्त केले आहे.

रोहित शर्मा (Rohit Sharma), ईशांत शर्मा (Ishant Sarma) हे दुखापतीतून सावरण्यासाठी BCCI च्या राष्ट्रीय क्रिकेट अकदामीत (NCA) तंदुरुस्तीसाठी दाखल झाले आहेत. ईशांतनं मालिकेतून माघार घेतली आहे, तर रोहितच्या सहभागाविषयी अद्यापही अनिश्चितता आहे. त्यातच पहिल्या कसोटीत आणखी एक खेळाडू खेळणार नसल्याचे संकेत मिळत आहेत.

पहिल्या ट्वेंटी-20 सामन्यादरम्यान हेल्मेटवर बॉल लागून आणि हॅमस्ट्रिंग इंज्युरीमुळे दुखापतग्रस्त झालेला रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) पहिल्या कसोटी सामन्याला मुकण्याची शक्यता आहे. आयसीसी (ICC) च्या नियमानुसार एखाद्या खेळाडूला सामन्यादरम्यान डोक्याला मार लागला असेल, तर त्याला किमान 7 ते 10 दिवसांचा आराम करावा लागतो. ज्यामुळे तो 11 तारखेपासून सुरू होणाऱ्या सराव सामन्यात सहभागी होणार नाही. त्यामुळे सरावसामना खेळल्याशिवाय टीम इंडियाची मॅनेजमेंट जडेजाला पहिल्या कसोटी सामन्यासाठी संधी देईल अशी शक्यता कमी आहे. बीसीसीआयनं अद्याप अधिकृत माहिती जाहीर केलेली नाही.

सराव सामने

6-8 डिसेंबर- भारत ए विरुद्ध ऑस्ट्रेलिया ए, वेळ पहाटे 5 वाजल्यापासून
11-13 डिसेंबर- भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया ए, वेळ सकाळी 9 वाजल्यापासून

कसोटी मालिका

17-21 डिसेंबर – अ‍ॅडलेड ओव्हल, वेळ सकाळी 9.30 वाजल्यापासून
26-30 डिसेंबर – मेलबर्न क्रिकेट ग्राउंड, वेळ पहाटे 5 वाजल्यापासून
7-11 जानेवारी 2021 – सिडनी क्रिकेट ग्राउंड, वेळ पहाटे 5 वाजल्यापासून
15-19 जानेवारी 2021 – ब्रिस्बेन क्रिकेट ग्राउंड, वेळ पहाटे 5 वाजल्यापासून

भारताचा कसोटी संघ

विराट कोहली, रोहित शर्मा, मयांक अग्रवाल, पृथ्वी शॉ, लोकेश राहुल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, हनुमा विहारी, शुबमन गिल, वृद्धीमान साहा, रिषभ पंत, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, उमेश यादव, नवदीप सैनी, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, आर आश्विन, मोहम्मद सिराज

ऑस्ट्रेलियाचा कसोटी संघ

डेव्हिड वॉर्नर, जो बर्न्स, विल पुकोव्हस्की, मार्नस लॅबुशेन, स्टीव्हन स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, मॅथ्यू वेड, टीम पेन (कर्णधार व यष्टीरक्षक), कॅमेरून ग्रीन, सीन अबॉट, मिचेल नेसेर, मिचेल स्टार्क, पॅट कमिन्स, जोश हेझलवूड, जेम्स पॅटिन्सन, नॅथन लियॉन, मिचे स्वेप्सन.