डेव्हिड वॉर्नरच्या दुखापतीसाठी पत्नीने मागितली माफी, म्हणाली – Sorry Australia

सिडनी : वृत्तसंस्था –   भारताविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वन डे मालिकेत ऑस्ट्रेलियानं २-० अशी विजयी आघाडी घेतली. त्यामुळे अंतिम सामन्यात भारतीय संघात चार बदल करण्यात आले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर ऑस्ट्रेलियानंही आपल्या संघात चार बदल करताना प्रमुख खेळाडूंना विश्रांती देण्याचा निर्णय घेतला आहे. पण ऑस्ट्रेलियाला सर्वांत मोठा धक्का बसला तो डेव्हिड वॉर्नरच्या दुखापतीचा. दुसऱ्या सामन्यात क्षेत्ररक्षण करताना वॉर्नरच्या मांडीचे स्नायू ताणले गेले आणि त्याला मैदान सोडावं लागलं. इतकंच नव्हे तर त्यानं मर्यादित षटकांच्या मालिकेतून माघार घेतली आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलिया वॉर्नरशिवाय तिसरा सामना खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे. अशातच वॉर्नरच्या या दुखापतीला आपण जबाबदार असल्याचे मत त्याची पत्नी कॅनडीस वॉर्नरनं व्यक्त करून ऑस्ट्रेलियाची माफी मागितली आहे. अर्थात तिनं मस्करी केली आहे.

दरम्यान, ट्वेंटी-20 आणि कसोटी मालिकेत वॉर्नरच्या खेळण्यावर साशंकता व्यक्त करण्यात येत आहे.

दुसऱ्या वन डे सामन्यात शिखर धवननं मारलेला फटका अडवताना वॉर्नरला दुखापत झाली
होती. त्याला त्वरित स्कॅनसाठी हॉस्पिटलमध्ये नेह्ण्यात आले. तो आता रिहॅब सेंटरमध्ये आहे. वॉर्नरच्या जागी ट्वेंटी-20 संघात डी’आर्सी शॉर्टचा समावेश केला आहे.

आयपीएल २०२० नुकतेच संपले. जवळपास चार महिने वॉर्नर क्रिकेटमध्ये व्यग्र होता. त्याला कुटुंबाला भेटता आले नव्हते. यूएईतून परतल्यानंतर वॉर्नरला १४ दिवसांच्या क्वाॅरंटाईन कालावधीत राहावे लागले होते. पण, काही दिवसांपूर्वी त्याला कुटुंबीयांना भेटता आले.

ट्रीपला एमस मूनमॅनशी बोलताना कॅनडीस म्हणाली, सॉरी ऑस्ट्रेलिया, वॉर्नरच्या दुखापतीला केवळ क्रिकेटच कारणीभूत नाही, तर भारताविरुद्धच्या सामन्यापूर्वी त्यांनी सेक्स केलं आणि त्यामुळे असं झाल्याची, हिंट तिनं दिली. वॉर्नर पहिल्या कसोटी सामन्यापूर्वी तंदुरुस्त होईल, असा विश्वासही तिनं व्यक्त केला. वॉर्नरनं पहिल्या वन डे सामन्यात ७६ चेंडूंत ६९ धावा केल्या, तर दुसऱ्या वन डेत ७७ चेंडूंत ८३ धावा केल्या होत्या.