IND-AUS सीरिजच्या अगोदर साऊथ ऑस्ट्रेलियामध्ये ‘कोरोना’ वाढला, बोर्डानं उचललं ‘हे’ पाऊल

मेलबर्न : वृत्तसंस्था – साऊथ ऑस्ट्रेलियामध्ये कोरोना व्हायरस संसर्गाची प्रकरणे अचानक वाढल्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या अनेक क्रिकेटर्सला एअरलिफ्ट करून न्यू साऊथ वेल्सला पोहाेचवण्यात आले. यामध्ये ऑस्ट्रेलियाच्या टेस्ट टीमचेसुद्धा अनेक खेळाडू आहेत. क्रिकेट ऑस्ट्रेलिया (सीए) ने ज्या खेळाडूंना चार्टर्ड फ्लाईटद्वारे दुसर्‍या ठिकाणी पोहाेचवले आहे, त्यामध्ये ऑस्ट्रेलियन टेस्ट कर्णधार टिम पेन, मार्नस लाबुशॅन, मॅथ्यू वेड आणि ट्रेविस हेड यांचा समावेश आहे.

क्रिकेट ऑस्ट्रेलियाने हा निर्णय यासाठी घेतला आहे, कारण स्थानिक क्रिकेट सीझन वाचवता यावा आणि सोबतच भारताविरुद्ध होणारी आगामी सीरिजसुद्धा प्रभावित होऊ नये. याशिवाय त्या खेळाडूंनासुद्धा एअरलिफ्ट करून दुसर्‍या ठिकाणी पोहाेचवण्यात आले, जी ऑस्ट्रेलिया-ए टीम आणि पुढील महिन्यापासून सुरू होणार्‍या बिग बॅश लीग (बीबीएल) मध्ये सहभागी होणार आहे.

साऊथ ऑस्ट्रेलियाने रविवारी म्हटले होते की, त्यांच्याकडे कोरोना प्रकरणे अचानक वाढू लागली आहेत आणि सोमवारी त्यांची संख्या 17 पर्यंत पोहाेचली होती. मात्र, मंगळवारी ही संख्या कमी होऊन 5 पर्यंत आली आहे. वेस्टर्न ऑस्ट्रेलिया, तस्मानिया आणि द नॉदर्न टॅरेटरीच्या सरकारांनी आपल्या सीमा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. तर क्विन्सलँडने एडिलेडहून येणार्‍या लोकांसाठी दोन आठवड्यांचा क्वाॅरंटाइनचा नियम बनवला आहे.

या सरकारांच्या निर्णयानंतर सीए आणि बीबीएल क्लबला आपल्या खेळाडूंच्या सुरक्षितता बाळगण्यासाठी त्यांना चार्टर विमानाने त्या ठिकाणी पोहाेचवण्याचा निर्णय घेण्यात आला जिथे त्यांना मॅच खेळायची आहे. भारतासोबत होणार्‍या महत्त्वाच्या सीरिजबाबत सीए पूर्णपणे काळजी घेत आहे. एडिलेडमध्ये कोरोनाची ताजी प्रकरणे समोर आली आहेत आणि तरीही सीएला विश्वास आहे की, दोन्ही टीमध्ये एडिलेड ओव्हलमध्ये होणार्‍या आतापर्यंतच्या पहिल्या दिवस-रात्र टेस्ट मॅचला स्थानांतरित करण्याची गरज भासणार नाही.