भारताचा ऑस्ट्रेलियाविरोधात विजयाचे विक्रमासह ‘अर्धशतक’

ओव्हल : वृत्तसंस्था – वर्ल्ड कप स्पर्धेत ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वोत्तम कामगिरीची नोंद करणाऱ्या टीम इंडियाने रविवारी रात्री ३६ धावांनी विजय मिळविला. ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताचा हा अर्धशतकी (५० वा) विजय ठरला आहे.

आतापर्यंत भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये १३७ सामने झाले असून त्यात ऑस्ट्रेलियाने ७७ वेळा विजय मिळविला आहे. तसेच भारताचा वर्ल्ड कपच्या इतिहासातील ऑस्ट्रेलियावरचा हा चौथा विजय ठरला आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताने वर्ल्ड कपमध्ये ३५३ ही सर्वोत्तम धावसंख्या ठरली आहे. यापूर्वी भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध ६ बाद २८९ अशी धावसंख्या १९८७ च्या वर्ल्ड कपमध्ये उभारली होती. हा सामना नवी दिल्ली येथे झाला होता.

या पराक्रमाबरोबर भारताने ऑस्ट्रेलियाला नमवून आणखी एक पराक्रम केला आहे तो म्हणजे ऑस्ट्रेलियाची एक दिवसीय क्रिकेटमधील विजयाची मालिका खंडीत केली आहे. या सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलियाने सलग १० सामन्यांमध्ये विजय मिळविला होता. त्यांची विजयाची मालिका या पराभवामुळे खंडित झाली आहे.

भारताने ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी ३५३ धावांचे आव्हान ठेवले होते. पण या आव्हानाचा पाठलाग करताना कांगारुंनी सर्व बाद ३१६ धावांची मजल मारली.

ऑस्ट्रेलियाकडून स्टीव्ह स्मिथ (६९), डेव्हिड वॉर्नर (५६) आणि अ‍ॅलेक्स कॅरीने (५५) अर्धशतके झळकाविली़ तरीही ऑस्ट्रेलियाचा विजय ३६ धावांनी दूर राहिला. भारताकडून भुवनेश्वर कुमार आणि जसप्रीत बुमराहने प्रत्येकी ३ गडी बाद केले. तर यजुवेंद्र चहलने २ विकेट घेतल्या.

त्याआधी शिखर धवनच्या शतकाला रोहित शर्मा, विराट कोहली, हार्दिक पंड्या, आणि महेंद्रसिंग धोनी यांच्या जबाबदार फलंदाजीची जोड मिळाली. त्यामुळे टीम इंडिया ५० षटकात ५ बाद ३५२ धावांचा वर्ल्ड कपमधील ऑस्ट्रेलियाविरुद्धची उच्चांकी धावसंख्या उभारु शकला.

आरोग्यविषयक वृत्त –

राष्ट्रीय ग्राहक तक्रार निवारण आयोगाचा निर्णय ; जुन्या आजारामुळे विम्याचा दावा नाकारता येणार नाही

नेत्रदानात अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालय राज्यात प्रथम

मेट्रोच्या कामामुळे मंत्रालय परिसरात डेंग्यू, मलेरियाची साथ

गॅस्ट्रोबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ, १२० रुग्ण बाधित