Ind Vs Aus : अजिंक्य रहाणेचं शानदार शतक, ऑस्ट्रेलियावर मोठी लीड मिळवण्याच्या तयारीत भारत

मेलबर्न : वृत्तसंस्था – ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताला आघाडी मिळवून देतानाच अजिंक्य रहाणे याने कप्तानी पारी खेळत झुंजार शतक झळकविले आहे.एकवेळ अडचणीत असलेल्या भारताला अजिंक्य रहाणे याने आपल्या संयमित खेळीने ऑस्ट्रेलियाविरुद्ध आघाडी मिळवून देण्याबरोबरच स्वत:चे वैयक्तिक १२ शतक पूर्ण केले. या कसोटीपूर्वी अजिंक्य रहाणे याने ६६ कसोटीत १११ डावांमध्ये ११ शतके झळकाविली आहेत.

त्याने कसोटी क्रिकेटमध्ये ४ हजार २४५ धावा केल्या आहेत.त्याचबरोबर २२ अर्धशतके केली आहेत. कसोटी सामन्यात त्याची १८८ ही सर्वोच्च धावसंख्या आहे. अजिंक्य रहाणे याने रवींद्र जडेजा बरोबर शतकी भागीदारी केली असून भारताला आतापर्यंत ७८ धावांची आघाडी मिळवून दिली आहे. रवींद्र जडेजा याने ३७ धावा करीत रहाणे याला सुरेख साथ देत आहे़.