टीम इंडियावर प्रत्येक क्षेत्रात ‘भारी’ पडला बांग्लादेशाचा संघ, ‘या’ 6 क्षणांमुळं पलटली मॅच

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारत आणि बांगलादेश यांच्यात काल झालेल्या पहिल्या टी-20 सामन्यात बांगलादेशने भारताचा 7 विकेटने पराभव केला. या विजयाबरोबरच बांगलादेशने तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली असून नाणेफेक जिंकून बांगलादेशने भारतीय संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. यावेळी भारतीय संघाने निर्धारित 20 षटकांत 148 धावा केल्या. त्यानंतर फलंदाजीसाठी उतरलेल्या बांगलादेश संघाने चेंडू राखत भारतीय संघावर शानदार विजय मिळवला. भारताच्या वतीने शिखर धवन याने सर्वाधिक 42 धावा केल्या तर बांग्लादेशच्या विजयात मुशफिकीर रहीम हा शिल्पकार ठरला.

टीम इंडिया पर हर फील्ड में भारी पड़ा बांग्लादेश, इन 6 मोमेंट्स ने पलटा पासा

मात्र कमजोर समजल्या जाणाऱ्या बांगलादेशने भारतीय संघाचा पराभव केल्याने या सहा कारणांमुळे भारतीय संघाला पराभवाला सामोरे जावे लागले असल्याचे बोलले जात आहे.

टीम इंडिया पर हर फील्ड में भारी पड़ा बांग्लादेश, इन 6 मोमेंट्स ने पलटा पासा

या सहा कारणांमुळे पराभव –

1) ढिसाळ आणि अनुभवहीन फलंदाजी –

कालच्या सामन्यात भारतीय संघात केवळ सलामीवीर रोहित शर्मा आणि शिखर धवन हे दोघेच अनुभवी फलंदाज होते. बाकी फलंदाजांना जास्त प्रमाणात अनुभव नव्हता. रोहित शर्मा, केएल राहुल, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत आणि शिवम दुबे या सर्व फलंदाजांना उत्तम कामगिरी करण्यात अपयश आले.

टीम इंडिया पर हर फील्ड में भारी पड़ा बांग्लादेश, इन 6 मोमेंट्स ने पलटा पासा

2) खराब गोलंदाजी –

या सामन्यात बांग्लादेशच्या फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. खलील अहमद आणि दीपक चाहर या दोन गोलंदाजांना देखील चांगली कामगिरी करण्यात अपयश आले. मुशफिकीर रहीम आणि महमदुल्लाह यांच्यात झालेली शेवटची नाबाद 40 धावांची भागीदारी भारतीय संघासाठी अवघड गेली. 19 व्या षटकात खलील अहमद याने जास्त धावा दिल्याने भारतीय संघाच्या पराभवावर शिक्कामोर्तब झाले.

टीम इंडिया पर हर फील्ड में भारी पड़ा बांग्लादेश, इन 6 मोमेंट्स ने पलटा पासा

3) स्पेशालिस्ट खेळाडूंची कमी –

सध्या भारतीय संघ व्यवस्थापन अष्टपैलू खेळाडूंवर मोठ्या प्रमाणात जोर देत असून कालच्या सामन्यात देखील वेगवान गोलंदाजाऐवजी शिवम दुबे याला संधी देण्यात आली. मात्र भारतीय संघाच्या विरोधात पडला. त्याचप्रमाणे कृणाल पंड्या याला देखील संधी देण्यात आली आहे. त्यामुळे संघ व्यवस्थापनाने स्पेशालिस्ट खेळाडूला संधी दिली असती तर कालच्या निकालाचे चित्र वेगळे दिसले असते.

टीम इंडिया पर हर फील्ड में भारी पड़ा बांग्लादेश, इन 6 मोमेंट्स ने पलटा पासा

4) खराब फिल्डिंग –

या सामन्यात भारतीय संघाने अतिशय खराब फिल्डिंग केली. 18 व्या षटकात युजवेंद्र चहलच्या गोलंदाजीवर कृणाल पंड्या याने राहीमचा सोपा झेल सोडल्याने भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला.

टीम इंडिया पर हर फील्ड में भारी पड़ा बांग्लादेश, इन 6 मोमेंट्स ने पलटा पासा

5) डीआरएस घेण्यात चूक –

डीआरएस घेण्यात देखील भारतीय संघाने काल मोठी चूक केली. 10 व्या षटकात मुशफिकीर रहीम हा बाद असल्याचे स्पष्ट झाले होते. मायर भारतीय संघाने यावर विशेष लक्ष्य न दिल्याने त्याने भारतीय संघाचा विजयाचा घास हिरावून घेतला.

टीम इंडिया पर हर फील्ड में भारी पड़ा बांग्लादेश, इन 6 मोमेंट्स ने पलटा पासा

6) 19 व्या षटकात खलिलला पडलेला मार –

19 व्या षटकात खलील या अहमद याला गोलंदाजी देणे हा रोहित शर्मा याचा निर्णय मोठ्या प्रमाणात चुकला. त्याच्या या षटकात सलग चार चौकार गेल्याने भारतीय संघ त्याच षटकात पराभूत झाला होता. त्यानंतर शेवटच्या षटकात केवळ चार धावा त्यांना विजयासाठी आवश्यक होत्या.

टीम इंडिया पर हर फील्ड में भारी पड़ा बांग्लादेश, इन 6 मोमेंट्स ने पलटा पासा

Visit : Policenama.com