‘या’ 5 खेळाडूनी बांगलादेशच्या जवळ गेलेल्या विजयाला स्वतःकडे ‘हिसकावून’ घेतलं, मालिका 2-1 नं जिंकली

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय संघाने तिसऱ्या आणि शेवटच्या कसोटी सामन्यात बांगलादेशचा 30 धावांनी पराभव केला. भारताने 20 षटकांत 174 धावा केल्या होत्या. त्यानंतर या धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या बांगलादेशला 144 धावाच करता आल्या. या सामन्यात विजयासह भारताने हि मालिका 2-1 अशी जिंकली.
या सामन्यात अनेक खेळाडूंनी उत्तम कामगिरी केली, मात्र आपण पाच खेळाडूंवर नजर टाकणार आहोत.

1)  दीपक चाहर
मध्यमगती गोलंदाज दीपक चाहर याने बांगलादेशी संघाचे कंबरडे मोडताना हॅट्रिकसह सहा विकेट घेतल्या. त्याने केवळ 3.2 षटकांत सात धावा देत बांग्लादेशच्या सहा विकेट काढल्या. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये हॅट्रिक घेणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे.

Related image

2) श्रेयस अय्यर
रोहित आणि धवन लवकर बाद झाल्यानंतर श्रेयस अय्यर याने भारतीय संघाची बाजू सावरून धरत शानदार अर्धशतकी खेळी केली. त्याने 33 चेंडूंमध्ये 3 चौकार आणि पाच षटकारांच्या साहाय्याने 62 धावा केल्या.

Related image

3) केएल राहुल
केएल राहुल याने देखील कालच्या सामन्यात शानदार फलंदाजी करत अर्धशतक झळकावले. त्याने 35 चेंडूंमध्ये 52 धावा केल्या. अय्यर आणि राहुलने तिसऱ्या विकेटसाठी 59 धावांची भागीदारी केली.

Related image

4) शिवम दूबे
शिवम दुबे याने या सामन्यात शानदार गोलंदाजी करत 30 धावा देत 3 विकेट मिळवल्या. त्याने बांगलादेशचा विकेटकिपर मुश्फिकुर रहीम याला बाद करत आपला पहिला बळी मिळवला.

Related image

5) मनीष पांडे
या मालिकेतील पहिला सामना खेळणाऱ्या मनीष पांडे याने देखील ताबडतोब 13 चेंडूंमध्ये 22 धावा केल्या.

Related image

Visit : Policenama.com