World Cup 2019 : टीम इंडियाचे सेमीफायनलचे तिकीट ‘कन्फर्म’ ; बांगलादेशचा २८ धावांनी पराभव

बर्मिंगहॅम : वृत्तसंस्था – वर्ल्डकपमध्ये भारताने बांगलादेशचा २८ धावांनी पराभव करत सेमीफायनलमध्ये प्रवेश केला. भारताने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करताना रोहित शर्माच्या धडाकेबाज शतकाच्या जोरावर ३१५ धावांचे आव्हान बांग्लादेशसमोर ठेवले. सलामीवीर रोहित शर्माच्या १०४ धावा आणि लोकेश राहुलच्या ७७ धावांच्या जोरावर भारताला बांगलादेशसमोर ३१५ धावांचे आव्हान देता आले.

या आव्हानाचा पाठलाग करताना बांगलादेश संघाने चांगलीच झुंज दिली. ६ विकेट पडलेल्या असताना शैफ्फुद्दीन आणि शबीर या दोन फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांसमोर सहजासहजी शरणागती पत्करली नाही. जसप्रीत बुमराहने शब्बीरला क्लीन बोल्ड करून ही जोडी फोडली आणि भारताच्या विजयाचा मार्ग सुकर झाला. जबरदस्त फॉर्मात असलेल्या मोहम्मद शमीने बांगलादेशचा फलंदाज तमीम इकबालला क्लिन बोल्ड करून भारताला पहिले यश मिळवून दिले. फिरकीपट्टू कुलदीप यादवच्या जागी भुवनेश्वरकुमारला घेतल्याचा संघाला फायदा झाला. केदार जाधवच्या जागी दिनेश कार्तिकला संघामध्ये स्थान देण्यात आले होते.

विक्रमवीर हीट मॅन

सलामीवीर रोहित शर्माने या वर्ल्डकपमधील ४ थे शतक झळकावले आहे. वर्ल्डकपमध्ये ४ शतके ठोकणारा रोहित शर्मा दुसरा खेळाडू ठरला आहे. त्याने संगकाराच्या विक्रमाशी बरोबरी केली. ऑस्ट्रेलियाचा फलंदाज डेव्हिड वॉर्नरला मागे टाकत या वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज रोहित शर्मा ठरला आहे.

चेहऱ्यावर ग्लो आणण्यासाठी ‘हा’ फेसपॅक लावा ; जाणून घ्या प्रोसेस

रक्त शुद्ध करण्यासाठी ‘या’ पदार्थांचे सेवन करा

ताण-तणाव दूर करून आनंदी जीवन जगा, ५ सोप्या पद्धती

तुम्ही खात असलेले अन्न हे शरीर व मनासाठी आरोग्यवर्धक आहे का ?