काय सांगता ! होय, विराटनं मैदानात चीटिंग केली (व्हिडिओ)

नवी दिल्ली :वृत्तसंस्था – भारत आणि बांगलादेश यांच्यात सुरु असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यातील पहिल्या दिवसाच्या खेळानंतर भारत मजबूत स्थितीत असून भारताने बांगलादेशला लोटांगण घालायला लावले आहे. बांगलादेशचा डाव 150 धावांत गुंडाळल्यानंतर भारताने पहिल्या दिवशी एक बाद 86 धावा केल्या आहेत. भारताच्या वतीने मोहम्मद शमी याने शानदार गोलंदाजी करताना तीन गडी बाद केले. या सामन्यादरम्यान भारताचा कर्णधार विराट कोहली याचा एका व्हिडीओ समोर आला असून यामध्ये तो प्रेक्षकांना हातवारे इशारा करत असताना दिसत आहे.

https://twitter.com/AkshayxVirat/status/1194903056141279232

या व्हिडिओमध्ये दिसून येत आहे कि, प्रेक्षक विराट कोहलीला चिअर करत होते. यामध्ये तो मला चिअर करू नका तर मोहम्मद शमीला चिअर करा असे बोलताना दिसत आहे. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून यामध्ये चाहते विराटला चीटिंग करू नका असे सांगत आहेत. या सामन्यात भारताने मजबूत पकड मिळवली असून आज दुसऱ्या दिवशी भारतीय संघाच्या खेळाकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. भारताने आतापर्यंत बांगलादेशविरुद्ध 9 कसोटी सामने खेळले असून यामध्ये भारताने 7 सामन्यांत विजय मिळवला आहे तर 2 सामने अनिर्णित राहिले आहेत.

दरम्यान, भारतीय संघाने आतापर्यंत घरच्या मैदानावर सलग 11 कसोटी मालिका जिंकण्याचा पराक्रम केला असून या मालिकेत विजय मिळवून विक्रमी 12 मालिका जिंकण्याचा पराक्रम करण्यासाठी भारत प्रयत्नशील असणार आहे.

Visit : Policenama.com