नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये ‘अदानी एंड-रिलायन्स एंड’ वर सुरु झाले ट्विटरवॉर, युजर्स म्हणाले – ‘आता काय गुजरातचे पण नाव बदलणार का ?’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   भारत आणि इंग्लंड दरम्यान तिसर्‍या कसोटी सामन्यात टॉस होण्यापूर्वी राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी जगातील सर्वात मोठ्या आणि अत्याधुनिक अश्या नरेंद्र मोदी स्टेडियमचे उद्घाटन केले. गुजरातमधील अहमदाबाद येथील सरदार पटेल स्टेडियम अर्थात मोटेरो स्टेडियमचे नूतनीकरण करून त्याला आता नरेंद्र मोदी स्टेडियम असे नाव देण्यात आले आहे. उद्घाटनानंतर राष्ट्रपतींनी आपल्या भाषणात म्हंटले की, “पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा गुजरातचे मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी या स्टेडियमची कल्पना केली होती. त्यावेळी ते गुजरात क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष होते. हे स्टेडियम पर्यावरणपूरक विकासाचे उदाहरण आहे. “गृहमंत्री अमित शहा म्हणाले,” आम्ही त्याचे नाव देशाच्या पंतप्रधानांच्या नावावर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. हा मोदीजींचा ड्रीम प्रोजेक्ट होता. ”

‘अदानी एंड’ आणि ‘रिलायन्स एंड’ वर वाद

यासह, स्टेडियमच्या एका टोकाला ‘अदानी पॅव्हिलियन एंड’ आणि दुसर्‍या टोकाला ‘रिलायन्स एंड’ असे नाव देण्यात आले आहे. यानंतर सोशल मीडियावर एकच खळबळ उडाली. आता चाहते प्रश्न विचारत आहेत की, स्टेडियमनंतर आता गुजरातचेही नाव बदलणार आहे का?

ऑलिम्पिक आकाराच्या 32 फुटबॉल स्टेडियमच्या बरोबर

हे स्टेडियम जवळपास 63 एकराहून अधिकच्या परिसरात पसरले आहे. ज्याची प्रेक्षकांची क्षमता एक लाख 32 हजार आहे. या स्टेडियमर तब्बल 800 कोटी रुपये खर्च करण्यात आल्याचे समजते. यापूर्वी मेलबर्न क्रिकेट ग्राउंड सर्वात मोठे स्टेडियम होते, ज्याची प्रेक्षकांची क्षमता 90,000 इतकी होती. हे ऑलिम्पिक आकाराच्या 32 फुटबॉल स्टेडियमच्या बरोबरीचे आहे. एमसीजीचे डिजाइन करणारे ऑस्ट्रेलियन आर्किटेक्ट फर्म पोपुलस यासह अनेक तज्ञ या स्टेडियमच्या बांधकामात सामील होते. यात लाल आणि काळ्या मातीचे 11 पिच तयार करण्यात आले आहेत. हे जगातील एकमेव स्टेडियम आहे ज्याच्या मुख्य आणि सराव पिचवर समान माती आहे.

https://twitter.com/vinayak_jain/status/1364506328182312960