Ind vs Eng : शतक हुकल्यानंतर बेन स्टोक्सनं आभाळाकडं पहात वडिलांना म्हंटलं Sorry , पाहा व्हिडीओ

पोलीसनामा ऑनलाइन टीम –   भारत आणि इंग्लंड यांच्यातील एकदिवसीय मालिकेच्या दुसर्‍या सामन्यात 650 हून अधिक धावा केल्या गेल्या. इंग्लंडच्या फलंदाजांनी 337 धावांचे लक्ष्य पूूर्ण केले. जॉनी बेअरस्टो आणि बेन स्टोक्ससमोर भारतीय गोलंदाज असहाय्य दिसत होते. बेअरस्टोने 124 धावा केल्या तर बेन स्टोक्सने 52 चेंडूत 99 धावा केल्या. स्टोक्सने त्याच्या स्फोटक खेळीने मैदानात सगळीकडे शॉट्स मारले. दरम्यान, 99 धावांवर बाद झाल्यानंतर पॅव्हिलियनमध्ये परत जात असताना तो भावूक झाला.

दुसर्‍या एकदिवसीय सामन्यात शतक गमावमल्याबद्दल त्याने आपल्या दिवंगत वडिलांची दिलगिरीही व्यक्त केली. पॅव्हिलियनमध्ये परत जात असताना, स्टोक्स वर पाहून वडिलांना सॉरी बोलताना दिसला. त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारने बेन स्टोक्सला बाद केले. स्टोक्सने भुवनेश्वरच्या शॉर्ट बॉलवर पुल शॉट खेचण्याचा प्रयत्न केला, पण चेंडू त्याच्या ग्लोव्हजला लागून ऋषभ पंतच्या हातात गेला. जर स्टोक्सने शतक ठोकले असते तर हे त्याच्या वनडे कारकिर्दीचे चौथे शतक ठरले असते.

स्टोक्स आपल्या वडिलांवर किती प्रेम करतो, याबद्दल

सर्वांना माहिती आहे. त्याचे वडील गेरार्ड स्टोक्स यांचे गेल्या वर्षी कर्करोगाने निधन झाले होते. माजी रग्बी खेळाडू आणि प्रशिक्षक गेरार्ड काही काळ ब्रेन कॅन्सरने त्रस्त होते. बेन स्टोक्स एक महिन्यापेक्षा जास्त काळ आपल्या आजारी वडिलांची देखभाल करण्यासाठी क्राइस्टचर्चमध्ये होता.

यापूर्वी दक्षिण आफ्रिकेत 2019 च्या मालिकेदरम्यान, स्टोक्सने मधले बोट बेंड करून वडिलांना सन्मान दिला. कारण खेळ सुरू ठेवण्यासाठी त्याच्या वडिलांना बोट बेंड करावे लागत असे.

इंग्लंडने हा सामना 6 गडी राखून जिंकला

एकदिवसीय मालिकेच्या दुसर्‍या सामन्याबद्दल बोलायचे झाल्यास भारताने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकांत 6 विकेट्सच्या मोबदल्यात 336 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल इंग्लंडने 337 षटकांत 43.3 गडी गमावून 337 धावांचे लक्ष्य गाठले. इंग्लंडने विजयासह तीन सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली. पुण्यातच खेळल्या गेलेल्या पहिल्या वनडे सामन्यात भारतीय संघाने 66 धावांनी विजय मिळवला. भारत आणि इंग्लंड यांच्यातील मालिकेतील शेवटचा सामना 28 मार्च रोजी पुण्यात खेळला जाईल.