IND vs ENG : ‘या’ 5 खेळाडूंमुळे टीम इंडिया ठरली अपयशी, तिसर्‍या टी-20 मध्ये करावा लागला पराभवाचा सामना

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : इंग्लंडविरुद्धच्या तिसर्‍या टी – 20 सामन्यात भारताला निर्णायक पराभवाचा सामना करावा लागला. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात पाहुण्या संघाने भारताचा आठ गडी राखून पराभव केला. या पराभवामुळे टीम इंडिया पाच सामन्यांच्या मालिकेत 1-2 ने मागे पडली आहे. टॉस हारल्यारनंतर प्रथम फलंदाजी करताना भारताने सहा गडी गमावून 156 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल इंग्लंडने 10 चेंडू शिल्लक असताना सामना जिंकला. अशा परिस्थितीत जाणून घेऊया भारताच्या या पराभवासाठी कोणते पाच खेळाडू जबाबदार होते?

केएल राहूल
टीम इंडियाचा स्टार सलामीवीर केएल राहुल पुन्हा एकदा फ्लॉप झाला. मंगळवारी टीम मॅनेजमेंटने इंग्लंडविरुद्धच्या तिसर्‍या टी -20 सामन्यात आत्मविश्वास व्यक्त करत त्याला तिसऱ्यांदा ओपनिंगची संधी दिली, पण त्याला त्या संधीचे सोने करता आले नाही. राहुल शून्यावर सलग दुसऱ्यांदा पॅवेलियनला परतला. तिसर्‍या षटकातील तिसर्‍या चेंडूवर मार्क वूडने त्याला बोल्ड केले. शेवटच्या चार डावांमध्ये तो तीन वेळा पॅवेलियनमध्ये परतला.

ईशान किशन
आपल्या डेब्यू सामन्यात शानदार फलंदाजी करणाऱ्या या युवा फलंदाजाची बॅट या सामन्यात शांत होती. तो केवळ नऊ चेंडूत चार धावा काढून पॅव्हेलियनमध्ये परतला. ख्रिस जॉर्डनने त्याची विकेेट केली. शेवटच्या डेब्यूत ईशानने 56 धावांची चमकदार खेळी केली.

श्रेयस अय्यर
सहाव्या क्रमांकावर फलंदाजीस आलेल्या श्रेयस अय्यरलाही जास्त काळ खेळपट्टीवर रहाणे शक्य झाले नाही. तो केवळ नऊ धावा करून बाद झाला. मार्क वूडने डेव्हिड मालानच्या हाती झेलबाद केले.

युजवेंद्र चहल  
गेल्या तीन सामन्यांत युजवेंद्र चहलची कामगिरी काही खास राहिली नाही. तो बर्‍यापैकी महाग असल्याचे सिद्ध झाले आहे. आजच्या सामन्यात चहलने चार षटकांत 41 धावा देऊन एक गडी बाद केला.

शार्दुल ठाकूर
वेगवान गोलंदाजांबद्दल जर आपण चर्चा केली तर शार्दुल ठाकूरही फ्लॉप झाला. त्याने एकही विकेट न मिळविता 3.2 षटकांचा गोलंदाजी करताना 36 धावा केल्या.