IND vs ENG : धोक्यात आली विराट कोहलीची वनडे रॅकिंगची ‘बादशाही’, ‘हा’ पाकिस्तानी खेळाडू स्थान बळकावू शकतो

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   भारत आणि इंग्लड यांच्यात सुरू असलेल्या एकदिवसीय मालिकेच्या पहिल्या सामन्यात कर्णधार विराट कोहलीने चांगली फलंदाजी करताना अर्धशतक झळकावले आहे. या खेळाडूने चांगल्या लयीत पुनरागमन केले आहे, परंतु चाहत्यांना त्यांच्या बॅटिंगने अप्रतिम शतक पाहण्यासाठी अजून थोडी वाट पहावी लागेल. विराट कोहली वनडे क्रिकेटचे अप्रतिम खेळाडू असण्यासोबत ICC चे रँकिंग नंबर १ चे फलंदाज आहेत आणि सध्याच्या मालिकेत त्यांची फलंदाजी कायम राखत आहे. मात्र, लवकरच त्यांच्या फलंदाजीकडून शतक न मिळवल्यास त्यांच्या हातून वनडे रँकिंगचे मुकुट जाऊ शकते.

कर्णधार विराट कोहलीचे मुकुट घेणाऱ्या खेळाडूंची गोष्ट केली तर यात कोणी दुसरे तिसरे नसून पाकिस्तानचे कर्णधार बाबर आजम यांचे नाव सर्वांत आधी येते, जे ICC च्या वनडे रँकिंगमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहेत. सध्या जाहीर केलेल्या ICC रँकिंग अनुसार विराट कोहली ८६८ रेटिंग पॉईंटसह पहिल्या स्थानावर आहेत, तर बाबर आजम त्यांच्यापेक्षा जास्त मागे नाहीत.

बाबर आजम ८३७ रेटिंग पॉईंटसह दुसऱ्या स्थानावर आहेत. पुढच्या महिन्यात पाकिस्तानची क्रिकेट टीम साऊथ आफ्रिकेच्या दौऱ्यावर आहे. जर तेथे बाबर आजम त्याने उत्कृष्ट प्रदर्शन दाखवतात केले तर त्याला विराट कोहलीकडून वनडे रँकिंगचा मुकुट घेण्याची संधी आहे.

भारतीय कर्णधार विराट कोहलीजवळ अजून इंग्लड विरुद्ध २ वनडे घेऊन ही दुरी वाढविण्याची संधी आहे. विराट कोहली या दोन मॅचमध्ये जर एक शतक घेतील तर ते १० रेटिंग पॉईंट मिळवतील ज्यामुळे ही दुरी वाढू शकते.

विराट कोहली सोडून पाकिस्तानचे कर्णधार बाबर आजम हे जगातील असे फलंदाज आहेत जे ICC च्या रँकिंगमध्ये टॉप १० मध्ये आहेत. बाबर आजम वनडेमध्ये दुसऱ्या क्रमांकावर, T२० मध्ये तिसरा आणि कसोटीमध्ये सहाव्या क्रमांकावर आहेत.