IND Vs NZ : 204 धावांचं ‘टार्गेट’ पडलं खुजं, ऑकलंडमध्ये भारताचा 6 विकेटनी ‘विजय’

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था – टीम इंडियानं ऑकलंड मध्ये टी-२० सामन्यात न्यूझीलंड ला ६ विकेट्स ने हरवलं. तसेच टीम इंडियानं पाच सामन्यातील पहिला सामना जिंकून सिरीज मध्ये १-० ची बढत घेतली आहे. टॉस हरल्यानं प्रथम फलंदाजीस उतरलेल्या न्यूझीलंडच्या संघानं २० षटकांत ५ गडी गमावून २०३ धावा केल्या आणि भारताला विजयासाठी २०४ धावांचे लक्ष्य दिले. या धावांचा पाठलाग करत टीम इंडियानं १९ षटकांत ४ गडी गमावून लक्ष्य हासील केले.

भारताकडून लोकेश राहुलनं २७ चेंडूत ४ चौकार व ३ षटकार ठोकत ५६ धावा पटकावल्या. कर्णधार कोहली ३२ चेंडूंत ४५ धावा करू शकला. पण सामन्याचा नायक ठरलेल्या श्रेयस अय्यरने अंतिम षटकात २७ चेंडूत ३ चौकार आणि ३ षटकारांसह नाबाद ५४ धावा काढून भारताला विजय मिळवून दिला. मनीष पांडे १४ धावा काढून नाबाद राहिला.

दरम्यान भारताची सुरुवात खराब झाली होती कारण रोहित शर्माच्या रूपात भारताला पहिला झटका मिळाला. रोहित फक्त ७ धावा काढून बाद झाला. रोहित शर्माला मिशेल सॅटनरने रॉस टेलरच्या हातात झेलबाद केले. रोहित बाद झाल्यानंतर केएल राहुल आणि विराट कोहलीने दुसर्‍या विकेटसाठी ९९ धावांची भागीदारी केली. केएल राहुल २७ चेंडूत ५६ धावा काढून बाद झाला. राहुलने आपल्या संपूर्ण पारीमध्ये ४ चौकार आणि ३ षटकार लावले. राहुलला बाद करून ईश सोढीने भारताला दुसरा मोठा झटका दिला.

केएल राहुल बाद झाल्यानंतर विराट कोहली देखील बाद झाला. ब्लेअर टिकनरने कोहलीला मार्टिन गुप्टिलच्या हातून झेलबाद केले आणि कोहलीच्या रूपात भारताला तिसरा धक्का दिला. ४५ धावा करून विराट कोहली बाद झाला. कोहलीने ३२ षटकारांच्या खेळीत ३ चौकार आणि १ षटकार लगावला.

न्यूझीलंड ने भारताला दिले २०४ रनांचे लक्ष

प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या न्यूझीलंडच्या संघाने २० षटकांत ५ विकेट गमावून २०३ धावा केल्या आणि भारताला विजयासाठी २०४ धावांचे लक्ष्य दिले. न्यूझीलंडकडून कॉलिन मुनरोने सर्वाधिक ५९ धावा केल्या. तर रॉस टेलरने ५४ धावा केल्या आणि कर्णधार केन विल्यमसनने ५१ धावा केल्या.

भारताकडून जसप्रीत बुमराह, युजवेंद्र चहल, शार्दुल ठाकूर, रवींद्र जडेजा आणि शिवम दुबे यांनी प्रत्येकी एक यश मिळवले. मोहम्मद शमी आणि शिवम दुबे या दोघांनी जास्त रन दिले त्यामुळे ते टीम इंडियाला खूप महागात पडले. शमीने चार षटकांत ५३ धावा दिल्या तर शिवमने तीन षटकांत ४४ धावा दिल्या.

न्यूझीलंडकडून कोलिन मुनरो आणि मार्टिन गुप्टिल हे सलामीला आले. या दोन्ही फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांना परेशान करून सोडले आणि रनांचा पाऊस पाडला. या दोघांनी ७.५ षटकांत ८० धावा काढल्या. आठव्या षटकात मार्टिन गुप्टिलला युवा अष्टपैलू शिवम दुबेने बाऊंड्री लाइनवर रोहित शर्माच्या हाती झेलबाद केले. मार्टिन गुप्टिल ३० धावांवर बाद झाला.

यानंतर मुनरोने कर्णधार केन विल्यमसनबरोबर पारिस पुढे नेले. कॉलिन मुनरोने ३६ चेंडूत आपल्या टी -२० आंतरराष्ट्रीय कारकीर्दीचे १० वे अर्धशतक पूर्ण केले. मुनरो एकूण धावसंख्या ११६ असताना पॅव्हेलियनमध्ये परतला. मुनरोने ४२ चेंडूत ६ चौकार व २ षटकार लगावले. शार्दुल ठाकूरने मुनरोची विकेट घेतली. कॉलिन डी ग्रँडहोम (0) रविंद्र जडेजाने 117 च्या एकूण धावसंख्यावर बाद केले. आता रॉस टेलर कर्णधाराला पाठिंबा देण्यासाठी आला आणि दोघांनीही ताबडतोब बल्लेबाजी करण्यास सुरुवात केली. केन विल्यमसन १७८ च्या एकूण धावसंख्यावर बाद झाला. केन विल्यमसनने २६ चेंडूत ४ चौकार आणि तब्बल ६ षटकार लगावले.

न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन २६ चेंडूत ५१ धावा काढून बाद झाला. केन विल्यमसनला यजुवेंद्र चहल ने विराट कोहलीच्या हाती झेलबाद करून न्यूझीलंडला चौथा धक्का दिला. केन विल्यमसननंतर विकेटकीपर फलंदाज टिम सेफर्टला फक्त १ धाव करता आली. जसप्रीत बुमराहने त्याला बाद केले. पण टेलरने एका टोकाला जोरदार फलंदाजी सुरूच ठेवली आणि टेलरने आपले अर्धशतक पूर्ण केले. टेलरने आपल्या नाबाद खेळीत २७ चेंडूंचा सामना करत ३ चौकार आणि ३ षटकार ठोकले. मिचेल सॅटनर दोन धावांवर नाबाद परतला.

न्यूझीलंडमधील टीम इंडियाचा विक्रम (टी -२० आंतरराष्ट्रीय मालिका)

१. भारत विरुद्ध न्यूझीलंड – २ सामन्यांची टी -२० आंतरराष्ट्रीय मालिका (२००८-२००९) – न्यूझीलंडने २-० असा विजय मिळविला होता.

२. भारत विरुद्ध न्यूझीलंड – ३ सामने टी -२० आंतरराष्ट्रीय मालिका (२०१८-२०१९) – न्यूझीलंडने २-१ असा विजय मिळविला होता.

न्यूझीलंडच्या भूमीवर भारताने फक्त एक टी -२० आंतरराष्ट्रीय सामना जिंकला आहे. तर न्यूझीलंडने उर्वरित चार सामन्यांमध्ये टीम इंडियाचा पराभव केला आहे.

न्यूझीलंडमधील टीम इंडियाचा विक्रम (टी २० आंतरराष्ट्रीय सामना)

१. भारत विरुद्ध न्यूझीलंड – २५ फेब्रुवारी २००९ – क्राइस्टचर्च – न्यूझीलंडने ७ विकेट्सने विजय मिळवला.

२. भारत विरुद्ध न्यूझीलंड – २७ फेब्रुवारी २००९ – वेलिंग्टन – न्यूझीलंडने ५ विकेट्सने विजय मिळविला.

३. भारत विरुद्ध न्यूझीलंड – ६ फेब्रुवारी २०१९ – वेलिंग्टन – न्यूझीलंड ८० धावांनी विजय मिळवला.

. भारत विरुद्ध न्यूझीलंड – ८ फेब्रुवारी २०१९ – ऑकलंड – भारताने ७ विकेट्सने विजय मिळविला.

५. भारत विरुद्ध न्यूझीलंड – १० फेब्रुवारी २०१९ – हॅमिल्टन – न्यूझीलंडने ४ धावांनी विजय मिळविला.

फेसबुक पेज लाईक करा – 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like