काय सांगता ! होय, जडेजानं MS धोनी अन् कपिल देव यांना मागे टाकत केला नवा ‘विक्रम’

ऑकलंड : वृत्तसंस्था – टी-20 मालिकेत न्यूझीलंडला हारवल्यानंतर न्यूझीलंडने याचा वचपा वनडे मालिकेत घेतला. भारताला वनडे मालिकेत 2-0 ने हरवल्याने भारताने ही मालिका गमावली. भारतीय संघाने ही मालिका गमावली असली तरी अष्टपैलू रविंद्र जडेजाने एक शानदार खेळी करताना भारतीय संघाला विजय मिळवून देण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचा हा प्रयत्न संघाला विजय मिळवून देऊ शकला नसला तरी त्याने एक अनोखा विक्रम आपल्या नावावर करून घेतला आहे. सातव्या क्रमांकावर फलंदाजीला येत त्याने अनोखा विक्रम करत कपील देव आणि महेंद्र सिंग धोनी यांना मागे टाकले आहे.

ऑकलंड येथे झालेल्या दुसऱ्या वनडेत जडेजाने सातव्या क्रमांकावर येत 73 चेंडूत 55 धावा करत भारतीय संघाला विजय मिळवून देण्याचा प्रयत्न केला. या खेळीमध्ये त्याने दोन चौकार आणि एक षटकार लगवला. मात्र न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या वनडेत भारतीय संघाला 22 धावांनी पराभव स्विकारावा लागला. 49 षटकात तो बाद झाला पण न्यूझीलंडला त्याने सह विजय मिळून दिला नाही.

कपील देव आणि महेंद्र सिंग धोनी यांनी सातव्या क्रमांकावर प्रत्येकी सहा अर्धशतक केल होती. जडेजाने या दोन दिग्गजांना मागे टाकत सातवे अर्धशतक साजरे करून त्यांना मागे टाकले. जडेजाने सहाव्या विकेटसाठी श्रेयस अय्यर सोबत 33 तर सातव्या विकेटसाठी शार्दुल ठाकूर सोबत 24, आठव्या विकेटसाठी नवदीप सैनीसह 76 धावांची आणि नव्या विकेटसाठी चहलसोबत 22 धावांची भागिदारी केली.

जडेजाने वनडे क्रिकेटमध्ये सातव्या क्रमांकावर फलंदाजी करताना सातवे अर्धशतक झळकावले. यासह भारताकडून या क्रमांकावर फलंदाजी करत सर्वाधिक अर्धशतक करण्याचा विक्रम त्याने स्वत:च्या नावावर केला. यापूर्वी हा विक्रम कपील देव आणि महेद्र धोनी यांच्या नावावर होता.