IND vs NZ : तब्बल 30 वर्षानंतर टीम इंडियावर ‘नामुष्की’ ओढावणार ?

माऊंट माउंगानुई : वृत्तसंस्था – न्यूझीलंड- भारत मधील तिसरा एकदिवसीय सामना होत आहे . या अगोदर भारताने २-० ने मालिका गमावली आहे. भारताला हा सामना क्लीन स्वीपची नामुष्की टाळण्यासाठी जिंकावा लागणार आहे. मालिका न जिकल्यास लाजिरवाणा असा विक्रम विराटच्या नावावर नोंद होईल . न्यूझीलंडने तिसरा सामनाही जिंकल्यास 1990नंतर ही पहिलीच वेळ असेल जेव्हा भारतीय संघाला वनडे मालिकेत क्लीन स्वीपचा सामना करावा लागणार आहे. 30 वर्षांपूर्वी टीम इंडियाला वेस्ट इंडिजविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत 5-0 असा पराभव पत्करावा लागला होता. 2006मध्ये दक्षिण आफ्रिकेनेही भारताकडून 4-0 एकदिवसीय मालिका गमावली होती, परंतु त्यानंतर पावसामुळे पहिला वनडे सामना रद्द झाला होता. न्यूझीलंडविरुद्धच्या सध्याच्या एकदिवसीय मालिकेत भारतीय संघ 2-0 ने पिछाडीवर आहे.

रोहितची कमी भासवतेय भारतीय संघाला
मयंक अग्रवाल आणि पृथ्वी शॉ यांनी मागील सामान्य चांगली कामगिरी केली होती. तरी संघाला मजबूत सुरवात देऊ शकले नाहीत. रोहित नसल्यामुळे भारताला चांगलेच अडचणीत टाकले आहे . रोहितने मागील १२ महिन्यात एकदिवसीय क्रिकेट मध्ये ५७ . ३० च्या सरासरीने धाव केल्या होत्या . तो नसताना धावा करण्याची संपूर्ण जबाबदारी कोहलीवर आली. त्याने ६६ धावा केल्या. श्रेयस अय्यरने शतक व अर्धशतक ठोकले परंतु रॉस टेलरने दोन्ही सामन्यांमध्ये भारतीय संघावर वर्चस्व राखले. अय्यरने चांगली खेळी केली म्हणून फिनिशरची भूमिका साकारू शकले नाही.

विराट कोहलीचा फॉर्म चिंतेचा विषय
विराटला ने टी-20 मालिकात चांगली कामगिरी केली. मात्र एकदिवसीय क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करता आलेली नाही. कोहली मागील सामन्यात सतत बोल्ड आऊट होत आहे. या सामन्यात विराट झेलबाद झाला. त्याने फक्त ९ धाव केल्या आहेत. ऑकलंडमधील दुसऱ्या सामन्यात कोहलीला टीम साऊदीने बोल्ड केले होते. विराटवर 12 वर्षांच्या करिअरमध्ये पहिल्यांदाच असे घडले आहे .

न्यूजीलंडचा संघ – मार्टिन गुप्टिल, हेनरी निकोल्स, केन विल्यम्सन, रॉस टेलर, टॉम लाथम, जेम्स नीशम, कॉलिन डी ग्रॅंडहोम, मिचेल सेंटनर, टिम साउदी, कयेले जेमीसन, हामिश बेनेट

टीम इंडिया – पृथ्वी शॉ, मयंक अग्रवाल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, के.एल राहुल, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकुर,नवदीप सैनी, युजवेंद्र चहल आणि जसप्रीत बुमराह