धोनीच्या देशभक्तीला सलाम : मैदानात केले असे काही ; पाहून व्हाल थक्क 

हॅमिल्टन : वृत्तसंस्था – भारतीय संघाला तिसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यात पराभव पत्करावा लागला. या सामन्यात महेंद्रसिंग धोनीला मोठी खेळी साकारता आली नसली तरी  सामन्यात धोनी एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आला आहे. भारताने नाणेफेक जिंकंत प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. सामन्याच्या १४ व्या षटकात मैदानात अचानक एक चाहता धोनीच्या दिशेने धावत आला. चाहत्याच्या हातात भारताचा तिरंगा होता. हा चाहता धावत येत धोनीच्या पाया पडण्यासाठी खाली वाकला. पण त्याच्या या कृत्यामुळे तिरंगा जमिनीवरलोळेल हे लक्षात येताच धोनीने तो चाहताच्या हातातून काढून घेतला. धोनीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. धोनीचं सर्वच स्तरांतून कौतुक होत आहे.

न्यूझीलंडविरुद्धच्या टी-२० सामन्यात भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. न्यूझीलंडचे फलंदाज मैदानावर होते. पहिल्या डावातील १४ वे षटक होते. त्यावेळी अचानक एक भारतीय प्रेक्षक मैदानावर आला. तो धोनीच्या दिशेनं धावला. त्याच्या हातात राष्ट्रध्वज होता. तो चाहता धोनीच्या पाया पडण्यासाठी खाली वाकला. त्याचवेळी त्याच्या हातातील तिरंगा जमिनीवर पडणार होता हे धोनीनं पाहिलं. त्यानं लगेच चाहत्याच्या हातातील तिरंगा घेतला.

भारतीय संघाला न्यूझीलंडविरुद्धच्या ट्वेंटी -२०  मालिकेत १-२ असा पराभव पत्करावा लागला. न्यूझीलंडने विजयासाठी ठेवलेल्या २१३ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताला ६ बाद २०८ धावांपर्यंतच मजल मारता आली. या पराभवामुळे भारताची सलग १०  ट्वेंटी२०  मालिकेतील अपराजित मालिका खंडित झाली. धोनीचा हा ३०० वा टी-२० सामना होता. टी-२०मध्ये इतके सामने खेळणारा तो पहिला भारतीय ठरला आहे. धोनीने आतापर्यंत आयपीएलमध्ये१ ७५, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ९६ आणि अन्य क्रिकेट स्पर्धांमध्ये काही सामने खेळले आहेत. आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये धोनीने ३६.८५च्या सरासरीने १ हजार ५५८ धावा केल्या आहेत.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like