IND vs NZ : रोहित शर्माच्या 2 सिक्समुळं सुपरओव्हरमध्ये भारताचा ‘विजय’, ‘बिग बी’ म्हणाले…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – टीम इंडियानं पाच सामन्यांच्या टी 20 सीरीज मध्ये 3 – 0 अशी अजिंक्य आघाडी घेतली आहे. बुधवारी हॅमिल्टनमध्ये झालेल्या न्युझिलंडविरुद्धच्या सामन्यात भारतानं न्युझिलंडला त्यांच्या मैदानात धूळ चारत इतिहास रचला. न्युझिलंडनं भारताला दिलेलं आव्हान गाठताना आणि त्यानंतर सुपर ओव्हरमध्ये रोहित शर्मानं धुवाधार बॅटींग करत विजय मिळवल्यानं बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन हे देखील इम्प्रेस झाले आहेत.

भारतीय टीमचा दमदार परफॉर्मंस पाहून बिग बी अमिताभ देखील टीम इंडियाचं कौतुक करण्यापासून स्वत:ला रोखू शकले नाहीत. अमिताभ यांनी ट्विटरवरून ट्विट केलं आहे. आपल्या ट्विटमध्ये ते म्हणतात, “इंडिया. इंडिया. इंडिया. सुपर ओव्हरमध्ये कमालीची विजय मिळवला. टी 20 चा तिसरा सामना न्युझिलंड विरुद्ध. सीरीज जिंकू. न्युझिलंडमध्ये पहिल्यांदाच अस झालं आहे… अभिनंदन. 2 बॉलमध्ये 10 रनांची गरज होती. रोहितं सलग 2 सिक्स मारले. अविश्वसनीय.”

पहिल्यांदाच रचला इतिहास
बिग बींचं हे ट्विट सध्या जोरदार व्हायरल होताना दिसत आहे. हजारो लोकांनी या ट्विटवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. अनेकांनी हे ट्विट लाईक आणि शेअर केलं आहे. भारतानं पहिल्यांदाच न्युझिलंडला त्यांच्याच मैदानात पराभूत करण्यासोबतच टी 20 इंटरनॅशनल सीरीज जिंकली आहे. भारत यापूर्वी न्युझिलंडच्या मैदानात टी 20 इंटरनॅशनल सीरीज जिंकू शकला नव्हता.

फेसबुक पेज लाईक करा

You might also like