न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे आणि टी-२० मालिकेतून विराट बाहेर

नेपियर : वृत्तसंस्था –  विराटला ऑस्ट्रेलियाच्या भारत दौऱ्याआधी आरामाची गरज आहे असे सांगत, न्यूझीलंडविरुद्धचे शेवटचे २ एकदिवसीय सामने आणि ३ टी-२० सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय टीमचा कर्णधार विराट कोहलीला विश्रांती देण्यात आल्याने तो हे सामने खेळू शकणार नाही असे बीसीसीआयनं घोषित केलं आहे.  गेल्या काही महिन्यांपासून विराट कोहली लागोपाठ क्रिकेट खेळतोय, त्यामुळे विराटला ऑस्ट्रेलियाच्या भारत दौऱ्याआधी आरामाची गरज आहे, असं संघ प्रशासन आणि निवड समितीला वाटत असल्याचं बीसीसीआयनं सांगितलं आहे. त्यामुळे विराट तिसऱ्या एकदिवसीय सामन्यानंतर खेळणार नसल्याचं  समजत आहे.

दरम्यान हॅमिल्टन आणि वेलिंग्टनच्या एकदिवसीय आणि त्यानंतर ३ टी-२० सामन्यांच्या मालिकेमध्ये रोहित शर्मा भारतीय संघाचं नेतृत्व करणार आहे. परंतु शेवटचे २ एकदिवसीय सामने आणि ३ टी-२० सामन्यांच्या मालिकेसाठी विराट कोहलीला बदली खेळाडू अजून देण्यात आलेला नाही. टी-२० मालिकेला ६ फेब्रुवारीपासून सुरवात होणार आहे.

शेवटच्या दोन एकदिवसीय सामन्यांसाठी भारतीय टीम

रोहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन, महेंद्रसिंग धोनी, केदार जाधव, दिनेश कार्तिक, विजय शंकर, शुभमन गिल, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद सिराज, खलील अहमद, रवींद्र जडेजा

टी-२० मालिकेसाठी भारतीय टीम

रोहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन, रिषभ पंत, दिनेश कार्तिक, केदार जाधव, महेंद्रसिंग धोनी, कृणाल पांड्या, कुलदीप यादव, युझवेंद्र चहाल, भुवनेश्वर कुमार, सिद्धार्थ कौल, खलील अहमद, शुभमन गिल, विजय शंकर.

एकदिवसीय सामन्यांचं वेळापत्रक

* दुसरा एकदिवसीय सामना- शनिवार २६ जानेवारी, माऊंट मॉनगनुई

* तिसरा एकदिवसीय सामना- सोमवार २८ जानेवारी, माऊंट मॉनगनुई

* चौथा एकदिवसीय सामना- गुरुवार ३१ जानेवारी, हॅमिल्टन

* पाचवा एकदिवसीय सामना- रविवार ३ फेब्रुवारी, वेलिग्टंन

* टी-२० मालिकेचं वेळापत्रक

*  पहिली टी-२० : बुधवार ६ फेब्रुवारी, वेलिग्टंन, दुपारी १२.३० वाजता

* दुसरी टी-२० : शुक्रवार ८ फेब्रुवारी, ऑकलंड, सकाळी ११.३० वाजतातिसरी

*  टी-२० : रविवार १० फेब्रुवारी, हॅमिल्टन  दुपारी १२.३० वाजता