…म्हणून स्मृती मानधनाने नाकारली कोहलीची १८ नंबरची जर्सी

वेलिंग्टन : वृत्तसंस्था – स्मृती मानधना ही सध्या आपल्या विक्रमांमुळे सध्या क्रिकेट विश्वात चर्चेत आहे. नुकतेच भारतीय महिला संघाची सलामीवीर स्मृती मानधना हिला आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) २०१८ वर्षातील सर्वोत्तम महिला क्रिकेटपटू म्हणून गौरविले आहे. तसेच स्मृतीने वन डे क्रिकेटमधील महिला फलंदाजांमध्ये अव्वल स्थान पटकावले आहे. तसेच सर्वात जलद अर्धशतक ठोकणारी भारतीय महिला क्रिकेटपटू होण्याचा मान तिने मिळवला आहे. या सामन्यानंतर स्मृतीची एका चॅनेलवरवर मुलाखात घेण्यात आली आणि त्यात तिनं एक धक्कादायक माहिती दिली आहे. तिला विराट कोहली घालत असलेली १८ क्रमाकांची जर्सी नको होती.

स्मृतीला ७ क्रमांकाची जर्सी हवी होती, परंतु ती उपलब्ध नसल्यामुळे संघ व्यवस्थापनाने तिला १८ क्रमांकाची जर्सी घालण्यास सांगितली. याबाबत स्मृती म्हणाली की,” आमचे संघ व्यवस्थापक विकास सर यांनी मला १८ क्रमांकाची जर्सी दिली. विराट कोहली १८ क्रमांकाची जर्सी घालतो, याची मला कल्पना होती. परंतु मला ७ क्रमाकांची जर्सी हवी होती. शाळेत माझा रोल क्रमांक ७ होता, म्हणून मी याच क्रमांकाला प्राधान्य देऊ लागले. ”

स्मृतीने १० एप्रिल२०१३ रोजी बांगलादेशविरुद्धच्या सामन्यातून भारताच्या वन डे संघात पदार्पण केलं. स्मृती मानधना ही वन डे क्रिकेटमध्ये द्विशतक ठोकणारी पहिली भारतीय महिला आहे.