WTC Final : ‘या’ प्रकारची आहे भारताची वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलची ‘जर्सी’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  भारतीय संघ 18 जूनपासून होणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या (WTC Final) अंतिम सामन्यासाठी सज्ज झाला आहे. सध्या सर्व भारतीय खेळाडू विलगीकरणात आहेत. 2 जून रोजी इंग्लंडला रवाना होणार आहेत. मात्र, त्यापूर्वी या सामन्यासंबंधी एक मोठा खुलासा भारताचा अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजाने केला आहे. रविंद्र जडेजाने भारतीय संघ सामन्यात वापरणाऱ्या 90 च्या दशकातील रेट्रो जर्सी स्वेटरचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.

RBI नं ‘या’ मोठया बँकेला ठोठावला तब्बल 10 कोटींचा दंड, जाणून घ्या कारण

भारतीय खेळाडू सध्या मुंबईत क्वारंटाइनमध्ये असून त्यांचा जोरदार सराव सुरु आहे. याचदरम्यान रविंद्र जडेजाने साऊथहॅम्पटन येथील रोझ बाउल स्टेडियमवर होणाऱ्या या सामन्यात भारतीय संघ जी जर्सी घालणार आहे त्याचा फोटो शेअर केला आहे. ज्याला त्याने ‘पुन्हा 90 च्या दशकात’ #lovingit #india’ असे कॅप्शन दिले आहे. नवीन जर्सी स्वेटर 90 च्या दशकात कसोटी क्रिकेटमध्ये खेळाडू घालत होते. ज्यामध्ये मध्यस्थानी INDIA असे लिहिले आहे. तर वरच्या एका बाजूला ICC WTC FINAL 2021 आणि दुसऱ्या बाजूला BCCI चा लोगो देण्यात आला आहे.

भारतीय संघाने मायदेशात इंग्लंडचा पराभव करत टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये प्रवेश केला होता. या सामन्यासाठी आयसीसीने नियम देखील जाहीर केले आहेत. सामन्यासाठी एक दिवस राखीव ठेवण्यात आला आहे. तसेच जर लढत ड्रॉ झाली तर दोन्ही संघांना संयुक्त विजेतेपद दिले जाईल.

भारतीय संघ

विराट कोहली (कर्णधार), अजिक्य राहणे (उपकर्णधार), रोहित शर्मा, शुभमन गिल, मयांक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, ऋषभ पंत, लोकेश राहुल, ऋद्धिमान साहा (फिटनेसवर अवलंबून) हनुमा विहारी, रविचंद्रन अश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, इशात शर्मा, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर, उमेश यादव

राखीव खेळाडू –

अभिमन्यू ईश्वरन, प्रसिद्ध कृष्णा, आवेश खान, अर्जन नागवासवाला

 

धक्कादायक ! Covid-19 संसर्गाच्या तुलनेत बुरशीजन्य आजारांनी अधिक मृत्यू