भारत – पाक सामन्यावर ‘१००’ कोटींचा सट्टा, खेळाडूंवरही लागली ‘बोली’

नवी दिल्ली : वृत्त संस्था – आयसीसी वर्ल्डकपमध्ये आज लक्षवेधी भारत – पाकिस्तान सामना होत आहे. या सामन्यावर सट्टा बाजाराचे देखील चांगलेच लक्ष्य लागले आहे. दिल्ल्लीतील NCR चा अवैध सट्टा बाजार १०० कोटी रुपयाच्या पुढे गेला आहे. सट्टेबाजांचे फरीदाबाद, गाजियाबाद, नोएडा, गुरुग्राम आणि दिल्ली जवळचा परिसर या भागात सट्टेबाजांचे नेटवर्क खूप मजबूत आहे.

सट्टा बाजारात भारताची बाजू भक्कम, भारतावर ६० % बोली

पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सट्टा बाजारात देखील भारताची बाजू भक्कम आहे. सट्टा केवळ सामन्याच्या जय पराजयावर लावलेला नसून प्रत्येक ओव्हर, प्रत्येक बॉल, कोण किती धावा बनवणार, कोण किती विकेट घेणार यावर देखील सट्टा लावण्यात आलेला आहे. सट्टाबाजारातील जास्त भाव म्हणजे ६० % भारताच्या बाजूने लावला आहे.

भारतीय खेळाडूंची किंमत ठरली

भारतीय खेळाडूंची किंमत ठरली आहे. उदारणार्थ जसप्रीत बुमराह साठी १५ रुपये आणि मोहम्मद आमिर साठी ६ रुपये. फलंदाजांवर देखील भाव ठरले आहेत. कोण अर्धशतक करणार कोण शतक करणार. भारताकडून रोहित शर्मा, विराट कोहली तर पाकिस्तानसाठी बाबर आजम तसेच पखर जमन यांच्यावर भाव लावले आहेत.

पोलीस उपायुक्त, मधुर वर्मा यांनी सांगितले की, आमची सट्टा बाजारावर चांगली नजर आहे. सट्टा बाजारात सामील असणाऱ्या लोकांवर कडक कारवाई करण्यात येईल. सट्टे बाजाराचे नेटवर्क फार मजबूत आहे. यामध्ये सामील असणाऱ्या लोकांना पकडणे फार अवघड आहे. तरीदेखील आम्ही पूर्ण प्रयत्न करणार असल्याचं दिल्ली पोलिसांनी सांगितले.

सिने जगत –

‘या’ टॉप ५ अभिनेत्री अति ‘गर्विष्ट’पणा, ‘वाईट’ वागणुकीसाठी ओळखल्या जातात, घ्या जाणून

बांगलादेशाची ‘सनी लिओनी’ देत आहे बॉलिवूडच्या अभिनेत्रींना ‘टक्‍कर’, पहा फोटोज्

सलमान खानवर ‘फिदा’ असलेल्या ‘या’ साऊथच्या अभिनेत्रीला हवी सलमान बरोबर ‘भुमिका’

बॉलीवुडची ‘ही’अभिनेत्री बनली ‘Most Gorgeous Women’, म्हणजेचे नंबर 1

You might also like