‘हायहोल्टेज’ मॅचमध्ये पाऊस बनणार ‘व्हिलन’ ? पावसाच्या अंदाजाने डकवर्थ लुईस ठरणार निर्णायक ?

मँचेस्टर : वृत्तसंस्था – भारत पाकिस्तानमधील क्रिकेटचा सामना हा केवळ खेळ नसतो. तर, ते दोन देशांमध्ये खेळले जाणारे एक युद्ध असते. मात्र, रविवारी होणाऱ्या सामन्यावर पावसाचे सावट कायम असून या हाय होल्टेज मॅचमध्ये पाऊसच व्हिलन ठरणार की काय ? अशी भिती व्यक्त केली जात आहे.

पावसामुळे या सामन्यात पूर्ण ५० षटकांचा खेळ होऊ शकला नाही तर डकवर्थ लुईसवर याचा निर्णय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे येथील हवामान आणि खेळपट्टीची स्थिती लक्षात घेऊन अगदी नाणेफेक जिंकल्यानंतरही प्रथम फलंदाजी घ्यावी की गोलंदाजी हा निर्णयही अतिशय महत्वाचा ठरणार आहे.
लढतीवर पावसाचे सावट कायम आहे, हे माहीत असूनही चाहते ब्लॅकमध्ये तिकीट मिळविण्याची धडपड करीत आहेत, यावरून भारत-पाक लढतीची उत्सुकता लक्षात येते.

मँचेस्टर येथील ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर आणि मैदानाबाहेर चाहत्यांची पहाटेपासूनच रिघ लागलेली आहे. काल रात्रीपासून येथे पावसाच्या सरी बरसल्या होत्या. आज सामन्यादरम्यान पावसाची शक्यता ६० टक्के सांगण्यात आली आहे. मात्र, सध्या मँचेस्टर येथील ढगाळ वातावरण दूर झाल्याचे दिसत असले तरी दुपारनंतर पुन्हा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

लंडनमधील हवामान खात्याने आतापर्यंत वर्तवलेला अंदाज खोटा ठरलेला नाही. पण, यावेळी तो खोटा ठरावा अशी सर्वांची अपेक्षा आहे.

पीच रिपोर्ट –

मँचेस्टरमधील ओल्ड ट्रॅफोर्डमध्ये ४५ एकदिवसीय सामन्यांत केवळ १८ वेळा प्रथम फलंदाजी घेतली गेली आहे. शेवटच्या पाच सामन्यांमध्ये सरासरी २६० धावा काढण्यात आल्या होत्या. प्रतिकुल हवामानाच्या स्थितीत प्रथम नाणेफेक जिंकणाऱ्या संघाने प्रथम क्षेत्ररक्षण घेणे योग्य.

हवामानाचा अंदाज –

रविवारी येथे क्रिकेट खेळण्यासाठी हवामान चांगले असण्याची अपेक्षा नाही. येथे जोरदार पाऊस होण्याची शक्यता असून दिवसभर पडण्याची शक्यता आहे. दिवसभर आकाश ढगांनी आच्छादलेले राहण्याची शक्यता आहे. तापमान १४ डिग्री सेल्सिअस ते १७ डिग्री सेल्सिअस दरम्यान राहील. थंड वातावरणामुळे वातावरणात आर्द्रता असणार नाही.

आरोग्यविषयक वृत्त –

मासिक पाळीदरम्यान या कारणांमुळे स्रियांचा मूड बदलतो

कमी वयात हार्ट अ‍ॅटॅक येण्याचे प्रमाण का वाढतेय ?

लहान मुलांना पॅरासिटामॉल देताना घ्या ‘ही’ काळजी

डोळ्यांच्या इन्फेक्शनपासून असा करा बचाव