पहिल्या ‘T – 20’ सामन्यापूर्वी क्रिकेटप्रेमींसाठी ‘वाईट’ बातमी

धर्मशाला : वृत्तसंस्था – वेस्ट इंडिज दौऱ्यावर भारतीय संघाने वेस्ट इंडिजला त्यांच्याच घराच्या मैदानावर धूळ चारणारी टीम इंडिया भारतात परत आली असून दक्षिण आफ्रिकेला हरवण्यासाठी सज्ज झाली आहे. आज भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघात टी-20 चा पहिला सामना धर्मशाला येथे खेळवण्यात येत आहे. मात्र, धर्मशाला येथे मागील दोन दिवसांपासून पाऊस पडत असून आज देखील या ठिकाणी पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

हवामान खात्याच्या अंदाजानुसार, पुढील पाच दिवस हिमाचल प्रदेशात पावसाची दाट शक्यता असून आज होणाऱ्या सामन्यात देखील पाऊस पडण्याचा अंदाज आहे. तसेच बीसीसीआयने देखील शनिवारी एक फोटो ट्विट करत शेअर केला आहे. यामध्ये मैदानाजवळील भागात काळे ढग दाटून आल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे आज रविवार सुट्टीचा दिवस सामन्याचा आनंद घेऊ इच्छिणाऱ्या क्रिकेटप्रेमींसाठी ही वाईट बातमी आहे.

विराट कोहली आणि रोहित शर्मा यांना या सामन्यात एकमेकांचे विक्रम मोडीत काढण्याची संधी आहे. सर्वात जास्त धावा काढून रोहीत शर्मा अव्वल स्थानी आहे. तर त्याचा विक्रम मोडीत काढून अव्वल स्थान पटवकावण्याची विराटला संधी आहे. दुसरीकडे टू-20 सामन्यामध्ये 50 पेक्षा अधिक धावा करण्याच्या विक्रमात कोहली 21 अर्धशतकांसह आघाडीवर आहे. रोहीतच्या नावावर 17 अर्धशतकं आणि चार शतकं आहेत. त्यामुळे रोहीतला विराटच्या जवळ जाण्याची संधी या सामन्यात आहे.

संभाव्य भारतीय संघ
विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, लोकेश राहुल, शिखर धवन, श्रेयस अय्यर, मनिष पांडे, रिषभ पंत, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, कृणाल पांड्या, वॉशिंग्टन सुंदर, राहुल चहर, खलील अहमद, दीपक चहर, नवदीन सैनी

You might also like