IND Vs SA : मयांक अग्रवालनं सेहवागशी केली ‘बरोबरी’, मोडला तब्बल 54 वर्षापुर्वीचा ‘रेकॉर्ड’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय क्रिकेट संघाचा सलामीवीर रोहित शर्मा याच्यानंतर आता मयांक अगरवाल यानेदेखील दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरु असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात दमदार सुरुवात करत शानदार द्विशतक झळकावले आहे. त्याच्या कारकिर्दीतील हा पाचवा कसोटी सामना असून त्याने कारकिर्दीतील पहिलीच मोठी खेळी त्याने द्विशतक करत केली. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध द्विशतक झळकावणारा तो दुसरा आशियाई सलामीवीर ठरला आहे. तसेच त्याने या खेळीबरोबरच वीरेंद्र सेहवाग याच्या विक्रमाशी देखील बरोबरी केली.

त्याचबरोबर प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये आता त्याच्या नावावर तीन मोठ्या खेळ्या झाल्या आहेत. तसेच पहिल्याच कसोटी शतकाचे द्विशतकात रूपांतर करणारा देखील तो 36 वा खेळाडू ठरला आहे. तसेच पहिल्याच कसोटी सामन्यात सलामी फलंदाजाने सर्वाधिक धावा करण्याचा दिलीप सरदेसाई यांचा विक्रम देखील मोडला. त्यानंतर आता त्याला विनोद कांबळी याचा 224 धावांचा रेकॉर्ड मोडण्याची संधी आहे. त्याचबरोबर करून नायर याच्या त्रिशतकाचा रेकॉर्ड मोडण्याची देखील संधी त्याच्याकडे आहे.

आफ्रिकेविरुद्ध भारतीय सलामीवीरांची कामगिरी
1) वीरेंद्र सेहवाग – 319 धावा
2) मयांक अग्रवाल – 215 धावा
3) रोहित शर्मा – 176 धावा

Visit : Policenama.com

तुमच्या मुलांच्या डोळ्यांची अशी घ्या काळजी, उपाय जाणून घ्या
जाणून घ्या ‘सेक्शुअल लाइफ’ असंतुष्ट असण्याची कारणे, अशी घ्या काळजी
चिंच आहे बहुगुणी, उन्हाचा कडाका वाढला तर आवश्य खा

शरीरात ‘या’ ठिकाणी लपतो ‘एड्स’चा व्हायरस, संशोधकांनी केला दावा
मधुमेहाचे औषध स्तनाच्या कॅन्सरवर उपयुक्त, चिनी संशोधकांचे मत
मुलांना कोणत्या वयात शाळेत घालावे? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत
ऑफिसमध्ये जेवण करताना घ्यावी ‘ही’ काळजी, तुमच्यासाठी ठरु शकते फायदेशीर
नाभीवर लावा २ थेंब दारु, दूर होतील पीरियड्ससंबंधीत ‘या’ समस्या, जाणून घ्या