IND Vs SA 2nd Test Match : भारताने द. आफ्रिकेवर 137 धावांनी विजय मिळवला

पुणे  : पोलीसनामा ऑनलाइन – भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका क्रिकेट सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेवर दमदार विजय मिळवला. पहिल्या डावात 601 धावांचा पाठलाग करण्यात दक्षिण अफ्रिकेच्या संघाला अपयश आहे. द. आफ्रिकेचा पहिला डाव 275 धावांत उरकला त्यानंतर भारतीय संघाकडून द. आफ्रिका फॉलोऑन देण्यात आला. दुसऱ्या डावात देखील आफ्रिकेच्या संघाला यश मिळवता आले नाही. भारताने हा सामना एक डाव आणि 137 धावांनी जिंकला.

3 कसोटी सामन्याच्या या कसोटी मालिकेत 2-0 अशी विजयाची दौड भारताने कायम ठेवली. विराट कोहलीने नाबाद राहत 254 धावा केल्या, मयांक आग्रवाल (180), अजिंक्य रहाणे (59), रविंद्र जडेला (91) चेतेश्वर पुजारा (58) यांच्या उत्तम खेळीने भारताने पहिल्या डावात 5 बाद 601 धावा कमावल्या. यानंतर आर आश्विन (4/69), मोहम्मद शमी (2/44), उमेश यादव (3/37) यांच्या गोलंदाजी समोर द . आफ्रिका संघाचा निभाव न लागल्याने पहिल्या डावात 257 धावात गारद झाला.

चौथ्या दिवशी कर्णधार कोहलीने द . आफ्रिकेच्या संघाला फॉलोऑन दिले. इशांत शर्माने तर पहिल्याच षटकात द. आफ्रिकेला दणका दिला. आर आश्विन, उमेश यादव यांनी देखील अनुक्रमे 2 आणि 1 अशा विकेट काढत उपहारापर्यंत आफ्रिकेचा 5 बाद 74 धावा अशा अवस्थेत होता.

त्यानंतर रविंद्र जडेजाने उपहारानंतर विकेट घेत आफ्रिकेला पुन्हा एक धक्का दिला. मोहम्मद शमीने आफ्रिकेची 7 वी विकेट घेतल्या. त्याने एस मुथूसामीला बाद केले. शमीचा हा आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधील 300 वा बळी ठरला. शमीने कसोटी सामन्यात 161, वन डे सामन्यात 131 तर टी – 20 सामन्यात 8 विकेट घेतल्या आहेत.

त्यानंतर डाव संथ सुरु होता, व्हेर्नोन फिलेंडर आणि केशव महाजन यांना संयमी खेळी केली आणि डाव लांबवण्याचा प्रयत्न केला. या दोघांनी 56 धावांची भागीदारी केली. परंतू ही जोडी फोडून भारताने द. आफ्रिकेचा डाव 189 डावात गारद केला.

Visit : Policenama.com