भारताचा 1 डाव 202 धावांनी ‘विजय’, दक्षिण आफ्रिकेला ‘व्हाइट वॉश’

रांची : वृत्तसंस्था – भारताने आज सकाळी खेळ सुरु होताच दक्षिण अफ्रिकेचे उरलेले दोन बळी झटपट मिळवले आणि आफ्रिकेवर १ डाव आणि २०२ धावाने विजय मिळविला. भारताचा हा लागोपाठ ११ वा मालिका विजय आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सर्व तीनही कसोटी जिंकून भारताने आफ्रिकेला ‘व्हाइट वॉश’ दिला आहे.

दक्षिण आफ्रिेकेला पहिल्या पहिल्या डावात १६२ धावात गुंडाळल्यावर दुसऱ्या डावात तिसऱ्या दिवसाच्या अखेरीस त्यांची ८ बाद १३२ अशी अवस्था केली होती. दक्षिण आफ्रिका संघ तिसऱ्या दिवशी २०३ धावांनी पिछाडीवर होता.

आज खेळ सुरु होताच आफ्रिकेला एक धाव भर घालता आली. केवळ १२ चेंडुत आफ्रिकेचे दोन्ही फलंदाज बाद करुन भारताने शानदार विजय मिळविला.

शाहबाद नदीम ने आपल्या पहिल्याच षटकात डी़ ब्रुइनला ऋधिमान साहा यांच्या हाती झेल देण्यास भाग पाडले. त्यानंतर लुंगी एन्गिडी को आपल्याच गोलंदाजीवर झेल पकडून आफ्रिकेचा डाव संपविला. आफ्रिकेचा दुसरा डाव १३३ धावात संपला.

विराट कोहली च्या टीम इंडियाने या विजयाबरोबरच एक इतिहास रचला. या पूर्वी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टीम इंडियाने विशाखापट्टनम, पुणे येथील कसोटी जिंकली होती. रांची येथील तिसऱ्या कसोटीत त्यांचा पराभव करुन घरच्या मैदानावर ३२ पैकी २६ कसोटी सामने जिंकले आहेत. टीम इंडिया २०१२ नंतर घराच्या मैदानावर पराभव पाहिला नाही.

Visit : Policenama.com

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like