India vs South Africa | टीम इंडिया आणि चाहत्यांना मोठा झटका, कर्णधार विराट कोहली दुसरी टेस्ट मॅच खेळणार नाही

जोहान्सबर्ग : वृत्तसंस्था – भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकेच्या (India vs South Africa) दुसऱ्या कसोटी सामन्याला (Test Match) द वॉन्डरर्स पार्कवर (The Wanderers Park) सुरुवात झाली आहे. या सामन्यात भारताने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु टीम इंडियाला (India vs South Africa) आणि भारतीय क्रिकेट चाहत्यांना मोठा झटका बसला आहे. याचा परिणाम कसोटी निकालावर देखील होण्याची शक्यता आहे. भारताचा कसोटी संघाचा नियमीत कर्णधार विराट कोहली (Captain Virat Kohli) दुसऱ्या कसोटीतून बाहेर झाला आहे. त्याच्या जागी आता केएल राहुल (KL Rahul) संघाचे नेतृत्व करणार आहे.

 

 

विराट कोहली अनफिट आहे, त्यामुळे तो दुसरी टेस्ट खेळू शकणार नाही. टीम इंडियाचे फिजिओ त्याच्यावर उपचार करत आहेत. तो तिसऱ्या टेस्टपूर्वी फिट होईल असे राहुलने टॉसच्या दरम्यान सांगितले. विराटच्या अनुपस्थितीमध्ये हनुमा विहारी चा (Hanuma Vihari) संघात समावेश करण्यात आला आहे.

 

टीम इंडियाचा टेस्ट टीमचा व्हाईस कॅप्टन रोहित शर्मा (Rohit Sharma) दुखापतीमुळे दौऱ्यापूर्वीच संघाबाहेर झाला आहे. त्यानंतर आता विराट कोहली ही दुसरी टेस्ट खेळणार नाही. या दोघांच्या अनुपस्थितीमध्ये केएल राहुल पहिल्यांदाच टेस्ट टीमची कॅप्टन्सी करणार आहे. भारत विरुद्ध दक्षिण आफिका यांच्यात होणाऱ्या एक दिवसीय मालिकेसाठी केएल राहुल कॅप्टन असल्याची घोषणा यापूर्वीच करण्यात आली आहे.

भारतीय संघ
केएल राहुल, मयंक अग्रवाल (Mayank Agarwal), चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara), हनुमा विहारी,
अजिंक्य राहणे (Ajinkya Rahane), ऋषभ पंत (Rishabh Pant), आर. आश्विन (R. Ashwin),
शार्दुल ठाकुर (Shardul Thakur), मोहम्मद शमी (Mohammad Shami), जसप्रीत बुमराह (Jaspreet Bumrah), मोहम्मद सिराज (Mohammed Siraj)

 

Web Title :- India vs South Africa | india vs south africa virat kohli miss second test kl rahul lead team india

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

OBC Reservation Maharashtra | ओबीसी आरक्षणाचा डेटा कधीपर्यंत मिळणार? अजित पवारांनी सांगितली महत्वाची माहिती

 

Ambernath Crime News | अंबरनाथ शहरातील धक्कादायक घटना ! फिरायला आलेल्या तरुणीवर 3 मित्रांनी केला सामुहिक बलात्कार

 

Upcoming IPO | तयार ठेवा पैसे ! येणार आहेत कमाईच्या 23 संधी, अदानीपासून बाबा रामदेव पर्यंतच्या कंपन्यांचे येणार आयपीओ

 

TET Exam  Scam | टीईटी पेपर फुटी प्रकरणात नवा खुलासा, आरोपी अश्विनकुमारने 700 विद्यार्थ्यांचे बदलले मार्क, G.A. Software चा संस्थापक गणेशन याचाही सहभाग उघड