भर मैदानात ‘हिटमॅन’ रोहितनं बॉलरला घातल्या शिव्या (व्हिडिओ)

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय संघाने नुकतीच दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळली. मात्र तिसऱ्या सामन्यात झालेल्या दारुण पराभवामुळे भारतीय संघाला मालिकेत 1-1 असे समाधान मानावे लागले.  या मालिकेत भारताच्या तरुण खेळाडूंना मोठ्या प्रमाणात संधी देण्यात आली होती. मात्र त्यांना  हवी तशी कामगिरी करता न आल्याने भारतीय संघासमोरील समस्यांमध्ये वाढ झाली आहे.

https://twitter.com/BattingAtDubai/status/1176469027218059264

टी-20 वर्ल्डकपच्या तोंडावर या कामगिरीमुळे भारतीय संघाची चिंता वाढली आहे. गोलंदाज आणि फलंदाज दोन्हीही फेल गेल्याने या वर्ल्डकपमध्ये नवीन खेळाडूंना संधी मिळणार का ? हा प्रश्न उपस्थित झाला आहे. मात्र या सगळ्या घडामोडींबरोबरच सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये प्रेक्षकांना त्याचे वेगळेच रूप पाहायला मिळत आहे.

या सामन्यात दक्षिण आफ्रिकेची फलंदाजी सुरु असताना नवदीप सैनी याने टाकलेल्या एका चेंडूवर आफ्रिकेचा फलंदाज बाऊमा याने खेळलेल्या फटक्यानंतर प्रेक्षकांना रोहित शर्मा याचा हा अवतार पाहायला मिळाला. कर्णधार विराट कोहली जखमी झाल्याने काही कालावधीसाठी मैदानाबाहेर गेला. त्यानंतर रोहितने कर्णधारपद घेतल्यानंतर सैनी याने केलेली गोलंदाजी पाहून रोहित खूप संतापला.

12 व्या षटकात सैनी याने तब्बल 12 धावा मोजल्याने रोहितला हा संताप अनावर झाला. त्यामुळे त्याच्या चाहत्यांना पहिल्यांदा त्याचा हा रुद्रावतार पाहायला मिळाला. दरम्यान, भारतीय संघ टी-20 मालिकेनंतर आता दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तीन कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. त्यामुळे क्रीडा रसिकांचे याकडे लक्ष लागून आहे.