रो’हिट’चं कसोटीत नाबाद शतक !

वृत्‍तसंस्था : 2019 च्या वर्ल्डकपमध्ये 5 शतकं ठोकणारा भारताचा हिटमॅन रोहित शर्मानं कसोटी क्रिकेटमध्ये नाबाद शतक झळकावलं. लोकेश राहुलच्या अनुपस्थितीत रोहित शर्माला दक्षिण अफ्रिकेविरूध्द कसोटी मालिकेत भारतीय संघात स्थान देण्यात आलं आणि रोहितनं त्याचा पुरेपुर फायदा देखील घेतला.

विशाखापट्टणमच्या मैदानावर पहिल्या कसोटी सामन्यात रोहितने संघ व्यवस्थापनाने टाकलेला विश्‍वास सार्थ ठरवला असून त्यांनं ताबडतोब शतक झळकावलं आहे. मयांक अग्रवालच्या साथीनं भारताच्या डावाची दमदार सुरूवात करणार्‍या रोहित शर्मानं 10 चौकार आणि 4 सिक्सर लगावत नाबाद 100 धावा केल्या. 154 बॉलमध्ये त्यानं नाबाद 100 धावा केल्या आहेत. त्यावेळी मयांक हा 76 धावांवर नाबाद होता.

Visit : policenama.com