IND Vs WI : पंतची खराब कामगिरी ? 3 कॅच सोडले !

कटक : वृत्तसंस्था – वेस्ट इंडिज विरुद्ध इंडिया च्या पहिल्या सामन्यात टीम इंडिया संकटात सापडली असताना ऋषभ पंतने जबाबदारीने खेळी करत आपल्या फलंदाजीने चाहत्यांना खुश केले होते. त्यानंतर दुसऱ्या वनडे सामन्यात देखील अखेरच्या षटकात आक्रमक फलंदाजी करून ऋषभ पंतने त्याच्यावर टीका करणाऱ्यांचे तोंड बंद केले होते. त्याच्या या कामगिरीमुळे त्याच्या चाहत्यांनीच नाही तर टीकाकारांनी देखील ऋषभचे कौतुक केले होते. पण तिसऱ्या वनडेत मात्र ऋषभने वारंवार मोठ्या चुका केल्या आणि त्यामुळेच सोशल मीडियावर नेटिझन्सनी त्याला पुन्हा एकदा ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.

खरतर वेस्ट इंडिजविरुद्धचा हा तिसरा आणि अखेरचा सामना आहे. त्यामुळे टीम इंडियासाठी हा सामना अतिशय महत्त्वाचा आहे. कारण दोन्ही संघांनी मालिकेत प्रत्येकी एक सामना जिंकला आहे. त्यामुळे अखेरच्या सामन्यात भारताला विजय मिळवणे गरजेचे आहे. विशेष म्हणजे टीम इंडियाने गेल्या १५ वर्षात देशात द्विपक्षीय मालिका गमावलेली नाही. असा महत्त्वाच्या सामन्यात ऋषभ पंतने एक दोन नव्हे तर चक्क तीन निर्णायक कॅच सोडले आहेत. आता त्याच्या या खराब कामगिरीमुळे टीम इंडियाला कोणत्या परिस्थितीतून जावे लागणार हे कळेलच.

ऋषभ पंतने तिन्ही कॅच फिरकीपटूंच्या गोलंदाजीवर सोडले. त्यातील दोन कॅच तर जडेजाच्या गोलंदाजीवर एका पाठोपाठ एक असे सोडले. तर तिसरा कॅच कुलदीप यादवच्या चेंडूवर सोडला. १६व्या षटकात कुलदीप यादव गोलंदाजी करत होता. षटकातील दुसऱ्या चेंडूवर रॉस्टर चेंजच्या बॅटला चेंडू लागला पण पंत तो कॅच पकडण्यास अयशस्वी ठरला. त्याने तब्बल तीन कॅच सोडले.

सध्या वेस्ट इंडिजचा हेटमायर हा इंडियाची डोकेदुखी ठरत आहे कारण तो खूप आक्रमक खेळी करत आहे. आणि पंतने हेटमायरचे दोन कॅच सोडून त्याला जीवदान दिले. जडेजा गोलंदाजी करत असताना लागोपाठ दोन वेळा पंतकडे हेटमायरच्या बॅटला चेंडू स्पर्श करून पंतकडे गेला, परंतु दोन्ही वेळा त्याने झेल गमावला. त्यानंतर वनडेत पदार्पण करणाऱ्या नवदीप सैनीच्या चेंडूवर हेटमायर ३७ धावांवर बाद झाला.

वेस्ट इंडिजच्या संपूर्ण दौऱ्यात भारतीय संघाकडून क्षेत्ररक्षणाची कामगिरी अत्यंत खराब झाली आहे. टी-२० मालिका आणि वनडे मालिकेत मिळून भारतीय संगाने १८ कॅच सोडले आहेत. सहा सामन्यातील भारतीय संघाच्या या कामगिरीवरून क्षेत्ररत्रक्षण किती खराब झाले आहे याची कल्पना येते. त्यामुळे या बाबतीत टीम इंडियाला सुधारणा करणे गरजेचे आहे अन्यथा पुढील मोठमोठ्या स्पर्धांमध्ये टीम इंडियाला याचा मोठ्या प्रमाणात फटका बसण्याची दाट शक्यता आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/