टीम इंडियाला मोठा धक्का ! शिखर धवन पाठोपाठ ‘हा’ खेळाडू दुखापतग्रस्त ?

पोलीसनामा ऑनलाईन : भारत विरुद्ध वेस्ट इंडिज या वन डे मालिकेला रविवारपासून सुरुवात होत आहे. मात्र, दुखापतीमुळे या मालिकेपूर्वीच शिखर धवननं माघार घेतली होती. त्यामुळे आता त्याच्या जागी मयांक अग्रवाल खेळणार आहे. त्यानंतर आता संघातील प्रमुख गोलंदाज भुवनेश्वर कुमारला तिसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यात दुखापत झाल्याने त्यालाही वन डे मालिकेत खेळण्याची संधी गमवावी लागणार आहे. मात्र, याबाबत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून (BCCI) अद्याप घोषणा करण्यात आलेली नाही.

चार महिन्यांच्या विश्रांतीनंतर भुवीनेश्वरन आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कमबॅक केले होते, परंतु वानखेडेवर झालेल्या तिसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यात भुवीला दुखापत झाली, त्याची दुखापत अजूनही पूर्णपणे बरी झाली नसल्याचं समजते. त्यामुळे त्याला वन डे मालिकेत विश्रांती दिली जाऊ शकते.

मिळालेल्या माहितीनुसार, अंतिम ट्वेंटी-२० सामना भारतानं ६७ धावांनी जिंकून मालिका २-१ अशी खिशात घातली. यावेळी भुवनेश्वरला दुखापत झाल्याने वैद्यकिय मदत घ्यावी लागली होती. त्यामुळे त्याच्या बदलीत संघात कोणाला संधी मिळेल, याची सर्वांना उत्सुकता लागली आहे.

भारताय संघ वन डे – विराट कोहली, रोहित शर्मा, मयांक अग्रवाल, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, युजवेंद्र चहल, दीपक चहर, श्रेयस अय्यर, केदार जाधव, कुलदीप यादव, भुवनेश्वर कुमार/??, मोहम्मद शमी, मनीष पांडे, रिषभ पंत, लोकेश राहुल

वेस्ट इंडिजचा वन डे संघ : किरॉन पोलार्ड ( कर्णधार), सुनील अ‍ॅब्रीस, अल्झारी जोसेफ, शे होप, खॅरी पिएर, रोस्टन चेस,शेल्डन कोट्रेल, ब्रँडन किंग, निकोलस पूरण, शिम्रोन हेटमायर, हेडन वॉल्श ज्युनियर, एव्हिन लुईस, रोमारियो शेफर्ड, जेसन होल्डर, किमो पॉल.

मालिकेचे वेळापत्रक :
वन डे मालिका
१५ डिसेंबर- चेन्नई
१८ डिसेंबर- विशाखापट्टणम
२२ डिसेंबर – कट्टक

फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/policenama/