अनुष्कामुळेच मी ‘सरळमार्गी’ झालो, विराटकडून पत्नी अनुष्काचं तोंडभरून कौतुक

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय संघ सध्या विंडीज दौऱ्यावर असून भारतीय संघ आपला पहिला कसोटी सामना खेळत आहे. त्याचदरम्यान भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि त्याची पत्नी अभिनेत्री अनुष्का शर्मा यांचे काही फोटो व्हायरल झाले असून यामध्ये दोघेजण खूप रोमँटिक मूडमध्ये दिसून येत आहेत.

टी-20 आणि एकदिवसीय मालिकेत विजय मिळवल्यानंतर विराटसेना आता कसोटी मालिका आपल्या खिशात घालण्यासाठी सज्ज आहे.

या जोडप्यासाठी हे नवीन नाही. मात्र हे फोटो टाकताना विराटने आपल्या आयुष्यातील बदलांचे श्रेय आपली पत्नी म्हणजेच अभिनेत्री अनुष्का शर्मा हिला दिले आहेत. त्याचबरोबर या फोटोंमध्ये दिसून येत आहे कि, अतिशय व्यस्त अशा विंडीज दौऱ्यात देखील तो आपल्या पत्नीला वेळ देत आहे.

दरम्यान, पहिल्या सामन्याआधी विराटनं आपली पत्नी अनुष्कासोबत क्वालिटी टाईम घालवला. विराट-अनुष्काचे समुद्रावरचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते.

या दोघांनी समुद्रकिनारी फिरण्याचा आनंद घेत फोटोदेखील काढले. त्याचबरोबर नुकतीच त्याने विंडीजचा माजी फलंदाज व्हिव रिचर्ड्स यांची देखील मुलखात घेतली होती. या मुलाखतीत त्याने आपल्या प्रेमाची पुन्हा एकदा कबुली दिली. त्याचबरोबर ती आपल्या आयुष्यात खास का आहे याचे देखील कारण सांगितले.

विरुष्का या नावानं प्रसिध्द असलेली विराट-अनुष्काची जोडी सगळ्यांसाठीच आदर्श आहे. सध्या अनुष्का विराटसोबत वेस्ट इंडिज दौऱ्यात सोबत आहे.

अनुष्काबद्दल बोलताना विराट म्हणाला कि, अनुष्काशी झालेले लग्न हा माझ्या आयुष्यातील मी सर्वात मोठा आशीर्वाद समजतो. त्याचबरोबर योग्य वयात योग्य व्यक्ती मिळणं देखील गरजेचं असतं, असेदेखील कोहली म्हणाला. त्याचबरोबर ती स्वतः प्रोफेशनल असल्याने आम्ही एकमेकांना चांगले समजून घेतो. तिच्याकडून मी खूप काही शिकलो असल्याचे देखील विराट कोहली याने म्हटले आहे. त्याने स्वतःमधील बदलांचे श्रेय देखील अनुष्काला दिले.

नुकत्याच एक मुलाखतीत विराटनं अनुष्कासाठी का खास आहे हे सांगितले. विराटनं दिग्गज फलंदाज व्हिव रिचर्ड्स यांना दिलेल्या मुलाखतीत आपल्या प्रेमाची पुन्हा एकदा कबुली दिली.

दरम्यान, अनुष्का शर्मा सध्या सिनेमांपासून दूर असून सोशल मीडियावर मात्र जोरात सक्रिय आहे. ती नेहमीच दोघांचे फोटो सोशल मीडियावर अपलोड करत असते.

आरोग्यविषयक वृत्त –

You might also like