वेस्ट इंडिज बरोबरच्या सिरीजसाठी भारतीय संघाची घोषणा, ‘हा’ खेळाडू करणार ‘कमबॅक’

कोलकाता : वृत्तसंस्था – बांगलादेशाविरुद्ध कसोटी मालिकेनंतर भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यामध्ये वन डे आणि टी-20 मालिका खेळवण्यात येणार आहे. या मालिकेसाठी आज भारतीय संघ जाहीर करण्यात आला. वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे संघात महाराष्ट्राच्या एका खेळाडूची एंट्री झाली आहे. भारताच्या निवड समितीचे प्रमुख एमकेएस प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली निवड समितीने भारताच्या संघात कोणकोण असले ते जाहीर केले. टी-20 सामन्यांची मालिका 6 डिसेंबर पासूनर सुरु होत आहे तर त्यानंतर वन-डे मालिका होईल. आज जाहीर झालेल्या संघामध्ये मोहम्मद शमीची निवड करण्यात आली आहे.

धोनी संघाबाहेर, निवृत्तीच्या चर्चांना उधाण
वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे आणि टी-20 संघाची आज घोषणा करण्यात आली. या मालिकांमध्ये भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी पुनरागमन करणार असल्याची चर्चा होती. मात्र, या संघात धोनीला स्थान देण्यात आलेले नाही. त्यामुळे यापुढे धोनीला संधी मिळणार की थेट निवृत्ती घेणार अशा चर्चांना उधाण आहे.

टी-20 संघ –
विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, शिखर धवन, केएल राहुल, ऋषभ पंत, मनीष पांडे, श्रेयस अय्यर, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, रवींद्र जडेजा, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, दीपक चाहर, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शामी

वनडे संघ
विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, शिखर धवन, केएल राहुल, ऋषभ पंत, मनीष पांडे, श्रेयस अय्यर, शिवम दुबे, केदार जाधव, रवींद्र जडेजा, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, दीपक चाहर, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शामी

टी-20 मालिका
– पहिला टी-20 सामना – 6 डिसेंबर (मुंबई)
– दुसरा टी20 सामना- 8 डिसेंबर (त्रिवेंद्रम)
– तिसरा टी20 सामना- 11 डिसेंबर (हैदराबाद)

वनडे मालिका
– पहिला सामना – 15 डिसेंबर (चेन्नई)
– दुसरा सामना- 18 डिसेंबर (विशाखापट्टणम)
– तिसरा सामना- 22 डिसेंबर (कटक)

Visit : Policenama.com