‘फाटलेलं’ अखेर ‘मिटलं’ ! कॅप्टन विराटनं शेअर केला मात्र त्यांनी रोहितची ‘खेचली’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – एकदिवसीय आणि टी-20 मालिकेत मिळवलेल्या धडाकेबाज विजयानंतर आता भारतीय संघ विंडीजविरुद्ध कसोटी मालिकेसाठी सज्ज झाला असून उद्यापासून सुरु होणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यांत संघात कुणाला संधी द्यायची हा मोठा प्रश्न भारतीय संघ व्यवस्थापनासमोर पडला आहे. त्याचबरोबर आजपासून खेळवल्या जाणाऱ्या सामन्यात विजय मिळवून भारतीय संघ जागतिक कसोटी चॅम्पियनशिपची सुरुवात विजयाने करण्याच्या इराद्यासह मैदानात उतरणार आहे.

त्याआधी भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि उपकर्णधार रोहित शर्मा यांच्यात मोठ्या प्रमाणात वाद असल्याच्या चर्चांनी जोर धरला होता. मात्र सध्या पहिल्या कसोटी सामन्याच्या पार्श्वभूमीवर व्हायरल झालेल्या फोटोमध्ये दोघेही मस्ती करताना दिसून येत असल्याने या दोघांमधील वाद संपुष्टात आल्याचे बोलले जात आहे. त्याआधी कोहलीने देखील आमच्यात असे काही वाद नसल्याचे म्हटले होते. त्यामुळे या दोघांमधील अफवा खोट्या असल्याचे सिद्ध होताना दिसून येत आहे.

या व्हायरल झालेल्या फोटोमध्ये कोहलीसह मयंक अग्रवाल, जसप्रीत बुमरा, इशांत शर्मा, रिषभ पंत, अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा आणि लोकेश राहुल हे दिसून येत असून सर्व खेळाडू हे शर्टलेस आहेत. या फोटोत सर्व खेळाडू आपले ऍब्स दाखवताना दिसून येत असून रोहित शर्मा हा रहाणे आणि राहुल यांच्या मागे लपताना दिसून येत आहे. या फोटोमध्ये हे दोघेही मस्ती करताना दिसून येत आहे. त्यामुळे दोघांचेही चाहते त्यांचा हा फोटो पाहून खुश झाले आहेत. त्याचबरोबर काही चाहत्यांनी रोहित शर्माला त्याच्या सुटलेल्या पोटावरून मोठ्या प्रमाणात ट्रोल देखील केले आहे. रोहित हा आपले पोट लपवण्यासाठी राहुलच्या मागे लपला असल्याचे एका चाहत्याने म्हटले आहे.

दरम्यान, आजच्या सामन्यांत पहिल्या कसोटीत पाच विशेष गोलंदाजांसह उतरण्याची शक्यता असलेल्या भारतीय संघामध्ये रोहित शर्मा आणि अजिंक्य रहाणे या दोघांपैकी कुणाला संधी द्यायची या यक्ष प्रश्न पडला आहे. त्यामुळे कोहली कुणाला संधी देतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

You might also like