वेस्ट इंडिजमध्ये टीम इंडियाचे ‘हे’ चार खेळाडू चालले नाही तर..

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय संघ ३ ते १४ ऑगस्ट दरम्यान वेस्टइंडीजमध्ये ३ टी -२० आणि ३ एकदिवसीय सामने खेळणार आहे. त्याचबरोबर अँटिग्वा आणि जमैका मध्ये दोन कसोटी सामने देखील खेळणार आहे. वर्ल्डकपमधील पराभवाला मागे सोडून भारतीय संघ पुन्हा नव्याने उभारी घेण्याचा प्रयत्न करणार आहे. अनेक खेळाडूंना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आलेला आहे तर बीसीसीआयने यावर कडक भूमिका घेत भारतीय संघाचा प्रशिक्षक देखील बदलण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे २०२३ च्या वर्ल्डकपच्या दृष्टीने भारतीय संघात युवा खेळाडूंना स्थान देण्यास सुरुवात केली आहे.

वर्ल्ड कपमध्ये पराभूत झाल्यानंतर आता भारतीय संघ वेस्ट इंडिज विरोधात खेळण्यास सज्ज आहे. 3 ऑगस्टपासून वेस्ट इंडिज दौऱ्य़ाला सुरुवात होणार आहे. यात 3 टी-20, 3 एकदिवसीय आणि 2 कसोटी सामने खेळले जाणार आहेत.

या चार खेळाडूंना अखेरची संधी

वर्ल्ड कपमध्ये भारताची डोकेदुखी ठरलेला चौथ्या क्रमांकाचा प्रश्न सोडवण्यासाठी मनिष पांडेला संधी दिली आहे. मनिष पांडेला सातत्य राखता न आल्यानं त्याला आपले संघातले स्थान अद्याप निश्चित करता आलेले नाही. मात्र वेस्ट इंडिज विरोधात त्याची बॅट तळपल्यास भारताला चौथ्या क्रमांकाचा फलंदाज मिळेल.

१) मनीष पांडे

चौथ्या क्रमांकावरील फलंदाज म्हणून मनीष पांडेला संधी देण्यात आली आहे. वर्ल्डकपममध्ये भरती संघ चौथ्या क्रमांकासाठी झटत होता. त्यामुळे मनीष पांडेला या स्थानावर संधी देऊन त्याला पुढील वर्ल्डकपसाठी तयार करण्यात येत आहे. त्यामुळे त्याला आपल्या खेळात सातत्य राखणे गरजेचे आहे.

34 वर्षीय केदार जाधवला 2019 वर्ल्ड कपमध्ये जास्त संधी मिळाल्या नाहीत. त्यामुळं स्वत:ला सिध्द करण्यासाठी केदार जाधवकडे ही शेवटची संधी असू शकते. केदारनं 65 सामन्यात 43.24च्या सरासरीनं 1254 धावा केल्या आहेत. केदार जाधव फेल झाल्यास शुभमन गीलला संघात स्थान मिळू शकते.

२) केदार जाधव

३४ वर्षीय केदारला या वर्ल्डकपमध्ये उत्तम कामगिरी करण्यात अपयश आले. मात्र या स्पर्धेत त्याला संधी देखील मिळाल्या नाहीत. त्याने आतापर्यंत ६५ एकदिवसीय सामन्यांत १२५४ धावा केल्या आहेत. त्यामुळे या दौऱ्यात त्याला उत्तम कामगिरी करावी लागेल अन्यथा त्याच्यासाठी हि शेवटची संधी ठरू शकते.

केएल राहुलनं वर्ल्ड कपमध्ये रोहितसोबत सलामीला फलंदाजी केली होती. एकदिवसीय क्रिकेटमध्ये राहुलचे प्रदर्शन चांगले असले तरी त्यानं 34 कसोटी सामन्यात केवळ 1905 धावा केल्या आहेत. त्यामुळं कसोटी क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी न केल्यास त्याची जागा पृथ्वी शॉ घेऊ शकतो.

३) केएल राहुल

शिखर धवनच्या दुखापतीनंतर सलामीला संधी देण्यात आलेल्या राहुलला वर्ल्डकपमध्ये म्हणावी तितकी चांगली कामगिरी करता आली नव्हती. ३४ कसोटी सामन्यात त्याला केवळ १९०५ धावा करता आल्या आहेत. त्यामुळे त्याने चांगली कामगिरी केली नाही तर पृथ्वी शॉ त्याची जागा घेऊ शकतो.

भारताचा यष्टीरक्षक ऋद्धिमान साहा 2018मध्ये शेवटचा कसोटी सामना खेळला होता. साहानं आतापर्यंत 32 कसोटी सामन्यात 1164 धावा केल्या आहेत. त्यामुळं वेस्ट इंडिज विरोधात चांगली कामगिरी न केल्यास केएस भारत आणि ऋषभ पंत यांना संधी मिळू शकते.

४) वृद्धिमान सहा

भारताचा हा यष्टीरक्षक फलंदाज आपला शेवटचा कसोटी सामना जानेवारी २०१८ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळला होता. त्यामुळे आता पुन्हा एकदा चांगली कामगिरी करण्याचे त्याच्यापुढे आव्हान आहे. आतापर्यंत ३२ कसोटी सामन्यात ११६४ धावा केल्या आहेत.त्याच्यासाठी देखील हि शेवटची संधी ठरू शकते.

आरोग्यविषयक वृत्त –