हिटमॅननं लपवलं सुटलेलं पोट तर विराटनं दाखवले 8 पॅक अ‍ॅब्स

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय संघ सध्या विंडीज दौऱ्यावर असून आजपासून दोन संघात पहिला कसोटी सामना खेळवला जाणार आहे. या सामन्याच्या आधी भारतीय कर्णधार विराट कोहली याचे फोटो व्हायरल झाले आहेत. या फोटोमध्ये कोहली टीम इंडियासह समुद्रकिनारी मस्ती करताना दिसून येत असून यामध्ये कोहलीने आपले 8 पॅक अ‍ॅब्स दाखवले असून उपकर्णधार रोहित शर्मा हा आपले सुटलेले पोट दाखवताना दिसून येत आहे.


या फोटोमध्ये कोहलीसह मयंक अग्रवाल, जसप्रीत बुमरा, इशांत शर्मा, रिषभ पंत, अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा आणि लोकेश राहुल हे दिसून येत असून सर्व खेळाडू हे शर्टलेस आहेत. या फोटोत सर्व खेळाडू आपले ऍब्स दाखवताना दिसून येत असून रोहित शर्मा हा रहाणे आणि राहुल यांच्या मागे लपताना दिसून येत आहे. आजपासून सुरु होणाऱ्या पहिल्या कसोटीत पाच विशेष गोलंदाजांसह उतरण्याची शक्यता असलेल्या भारतीय संघामध्ये रोहित शर्मा आणि अजिंक्य रहाणे या दोघांपैकी कुणाला संधी द्यायची या यक्ष प्रश्न पडला आहे. दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला कसोटी सामना उद्यापासून सर विवियन रिचर्ड्स स्टेडियम मध्ये खेळवला जाणार आहे.

दरम्यान, आजपासून खेळवल्या जाणाऱ्या सामन्यात विजय मिळवून भारतीय संघ जागतिक कसोटी चॅम्पियनशिपची सुरुवात विजयाने करण्याच्या इराद्यासह मैदानात उतरणार आहे.

आरोग्यविषयक वृत्त –

You might also like